esakal | 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा देगावला मदतीचा हात; 'टॉप गियर'ने जपली सामाजिक बांधिलकी
sakal

बोलून बातमी शोधा

Degaon

देगाव हे सातारा औद्योगिक क्षेत्राला लागून असल्याने येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहून 'हा' निर्णय घेण्यात आला.

'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा देगावला मदतीचा हात; 'टॉप गियर'ने जपली सामाजिक बांधिलकी

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

अंगापूर (सातारा) : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार (Art of Living Family), टॉप गियर ट्रान्समिशन व देगाव ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने देगाव (ता. सातारा) येथे श्री श्री कोविड सेंटरचा (Covid Center) प्रारंभ तहसीलदार आशा होळकर (Aasha Holkar) यांच्या हस्ते झाला. या सेंटरमध्ये 30 बेडची सोय आहे. (Covid Center Of 30 Oxygen Beds At Degaon Satara News)

या वेळी टॉप गियर ग्रुपचे प्रमुख श्रीकांत पवार, "मास'चे अध्यक्ष उदय देशमुख, आर्ट ऑफ लिव्हिंगचे उमेश शिंदे उपस्थित होते. देगाव हे सातारा औद्योगिक क्षेत्राला लागून असल्याने आणि येथील कोविड रुग्णांची (Covid Patient) वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहून हा निर्णय घेण्यात आला. या सेंटरमध्ये 30 बेडची सुविधा असून, ऑक्‍सिजन, बॅक अप जनरेटरसह, वाफारा मशिन, फळे, नास्ता, जेवण, औषधे, गरम पाणी, रुग्णवाहिका आदी सुविधा आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे मोफत करण्यात आल्या आहेत.

अनेक ग्रामस्थांनी वस्तू स्वरूपात मदत केली आहे. रुग्णांसाठी दररोजच्या दिनक्रमात योगा, प्राणायम, मेडिटेशन असणार आहे. हे सेंटर सुरू करण्यात देगावमधील युवक, ग्रामसेवक, तलाठी, आशा सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सेंटरचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन श्रद्धा पवार, सुहास फरांदे हे करत असून, डॉ. फडतरे दांपत्य रुग्णांची काळजी घेत आहे.

Covid Center Of 30 Oxygen Beds At Degaon Satara News

हेही वाचा: वाईच्या सागरसाठी "शिवराय'चे मावळे ठरले देवदूत

loading image
go to top