esakal | वाईच्या सागरसाठी कऱ्हाडकर ठरले देवदूत; "शिवराय'च्या मावळ्यांचे रक्तदानातून जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

blood donation

वाईच्या सागरसाठी "शिवराय'चे मावळे ठरले देवदूत

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : अन्नातून विषबाधा झाल्याने वाई (wai) तालुक्‍यातील चिखली येथील सागर मांढरे या युवकाची अन्ननलिका (oesophageal) खराब झाली होती. अन्ननलिकेच्या शस्त्रक्रियेसाठी 19 पिशवी रक्त (blood) लागणार होते. कसेबसे चार पिशवी मिळाले. मात्र, 15 पिशवी रक्ताची गरज होती. ती कऱ्हाडच्या शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या (trekking group) 15 मावळ्यांनी रक्तदान (blood donation) करून पूर्ण केली. कृष्णा रुग्णालयात (krishna hospital) आजाराशी झुंज देणाऱ्या युवकालाही त्यामुळे जीवदान मिळाले आहे. satara-positive-news-15-youths-donated-blood-saved-life-karad-wai

कऱ्हाडच्या दक्ष कराडकर व्हॉट्‌सऍप ग्रुपवर (whatsapp group) मध्यरात्री मदतीची पोस्ट फिरली. त्यानंतर अवघ्या काही तासात त्या युवकाला रक्तदानाने जीवदान मिळाले. मदत करणाऱ्या शिवराय ट्रेकिंगच्या मावळ्याचे कौतुक होत आहे. वाई तालुक्‍यातील सागर मांढरे अन्नातून विषबाधा झाल्याने 20 दिवस येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये झुंज देतो आहे. त्याच्या घरची स्थिती अत्यंत बेताची आहे. काही दिवसांपूर्वी त्याला अन्नातून विषबाधा झाली. तो कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. विषबाधेमुळे अन्ननलिका खराब झाली आहे. त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी 19 बॅग रक्त लागणार होते. 19 पैकी चार पिशव्या रक्त जमा होते. मात्र, 15 पिशवी रक्ताची गरज होती. त्यामुळे त्याच्या मदतीची पोस्ट काल येथील दक्ष कराडकर व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मध्यरात्री बाराच्या सुमारास फिरली. युवकाची आर्थिक स्थिती बेताची असल्याचाही त्यामध्ये उल्लेख होता. ती पोस्ट शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे ब्रिजेश रावळ यांनी वाचली. त्यांनी त्याची खात्रीही केली. खरच गरज असल्याचे लक्षात येताच ट्रेकिंगचे सदस्य रक्तदानासाठी पुढे आले.

बघता बघता दुपारपर्यंत ट्रेकिंगच्या 15 मावळ्यांनी 15 पिशवी रक्तही युवकाला दिले. त्यामुळे युवकाला जीवदानही मिळाले. ट्रेकिंग ग्रुपचे ब्रिजेश रावळ यांनी रात्री पोस्ट वाचल्यानंतर तत्काळ त्याची खात्री केली. रात्री बारानंतर त्यांनी फोन केले. आज सकाळी रक्तदात्यांचे एकत्रीकरण करून संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाशी संपर्क साधला. त्यांनी नियोजन केले. त्यानुसार दुपारी चार वाजेपर्यंत 15 जणांनी रक्तदानाची मोहीम फत्ते केली. त्यानंतरच सारे मावळे जेवले, हेही वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा: अन्नाच्या शोधार्थ परदेशी गिधाडाची 'सह्याद्री'त गिरकी; 'व्याघ्र'त दुर्मिळ 'ग्रिफॉन'ची नोंद

या मावळ्यांचे योगदान

नीलेश पाटील, अमोल जगताप, प्रसाद थोरात, दत्तात्रय थोरात, सचिन खिलारे, महेश सुतार, कार्तिक जाधव, रमेश कुष्टे, शंकर हराळे, रोहित हजारे, गणेश पवार, धनंजय जाधव, अमित आमणे, तुषार पाटील आणि आशितोष गोळे यांनी पुढे होऊन रक्तदान केले.

हेही वाचा: साता-यातील हाॅटेलवर पाेलिसांचा छापा

ब्लाॅग वाचा