पॉलिहाउसमध्ये काकडीचे पीक दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

सोमाटणे -  पॉलिहाउसमध्ये काकडीचे पीक घेण्याचा सांगवडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे, त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ होणार असल्याचे मत या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.

सोमाटणे -  पॉलिहाउसमध्ये काकडीचे पीक घेण्याचा सांगवडे येथील शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे, त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ होणार असल्याचे मत या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.

सांगवडे येथील प्रगतशील शेतकरी सुरेश राक्षे यांनी यापूर्वी आपल्या पॉलिहाउसमध्ये दुधी भोपळा, दोडके, कारले आदी जातीच्या भाजीपाला पीक  घेण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या प्रयोगात नेहमीपेक्षा उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचे त्यांना दिसून आले होते. या वर्षी त्यांनी आपल्या पंधरा गुंठे शेतातील पॉलिहाउसमध्ये प्रथमच काकडीचे पीक लावले आहे. सध्या या पॉलिहाउसमधील काकडी तोडणीला आली असून, बाजार चांगले राहिले तर किमान एक लाखाचे उत्पादन निघण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पॉलिहाउसमध्ये काकडीचे पीक घेतल्याने मजुरीचा खर्च निम्मा कमी झाला, तर रोगाचे प्रमाण कमी झाल्याने औषध फवारणीचा खर्चही कमी झाला. इतर शेतकऱ्यांनी पॉलिहाउसमध्ये पीक घेतल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवता येते, असे मत राक्षे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cucumber's crop doubles in the polyhouse

टॅग्स