शंभरीच्या उंबरठ्यावरही सायकल प्रवास सुरूच!

स्वप्नील पवार
Tuesday, 5 June 2018

देवराष्ट्रे - जागतिकीकरणाच्या रेट्यात सायकलीला अनेक पर्याय समोर आले असताना रामापूर (ता. कडेगाव) येथील गणपती बाळा यादव हे आजोबा  वयाच्या ९७ व्या वर्षी रोज सायकल चालवतात. वयाच्या सोळाव्या वर्षी या आजोबांनी सायकल चालवायला सुरवात केली. आजअखेर त्यांचं सायकलीवरचं प्रेम कमी झालेलं नाही. 

कडेगाव तालुक्‍यात त्यांना सायकलवाले मामा म्हणून ओळखले जाते. गणपा यादव यांचे कोणतेही काम  असले तर सायकलवरून जातात. गणपा मामा आजारी  जरी असले तर ते दवाखान्यासाठी चिंचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात. तेही सायकलवरून रामपूर ते चिंचणी हे अंतर १० किलोमीटर आहे. तरीही गणपा मामा न थकता सायकल मारतात. गणपा मामा यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासमवेत चळवळीत काम केले आहे. 

सायकल म्हणजे जगण्याचा माझा जीवनमंत्र आहे. सायकल चालवल्याने आरोग्य उत्तम राहते. माजी प्रकृती सायकल चालवण्यानेच ठणठणीत आहे. तरी तरुण पिढीने सायकल चालवा व आरोग्य उत्तम ठेवा.
- गणपती यादव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cycle journey ganpati yadav motivation