रद्दी पेपरच्या कागदापासून शोभेच्या वस्तू

जगन्नाथ माळी
सोमवार, 30 जुलै 2018

उंडाळे - यू ट्यूबवरील संकेतस्थळावरील माहिती घेऊन येथील युवक प्रदीप पाटील यांनी रद्दी पेपरच्या कागदापासून शोभेच्या वस्तू बनवल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या आकर्षक वस्तू परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे. 

उंडाळे - यू ट्यूबवरील संकेतस्थळावरील माहिती घेऊन येथील युवक प्रदीप पाटील यांनी रद्दी पेपरच्या कागदापासून शोभेच्या वस्तू बनवल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या आकर्षक वस्तू परिसरात कुतूहलाचा विषय ठरला आहे. 

नेहमी वेगळे काही करण्याचा छंद असलेल्या श्री. पाटीले यांचे येथील बस स्थानकावरील चौकात पान शॉपचे दुकान आहे. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या श्री. पाटील यांना इतर युवकांप्रमाणे मोबाईलचे वेड आहे. त्यांनी यू ट्यूबवरील संकेतस्थळावरून रद्दी पेपरपासून शोभेच्या वस्तू बनवण्याची माहिती घेऊन त्यांनी त्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा प्रयत्न केला. थोड्या सरावानंतर त्यांना ते जमू लागले. आता तर ते एखाद्या व्यावसायिक कलाकराप्रमाणे वस्तू बनवू लागलेले आहेत. पेपरच्या कागदापासून धबधबा, पेन स्टॅंड, मोबाईल स्टॅंड, फुलराणी, फोटो फ्रेम, वेगवेगळी फुले, विविध प्रकारच्या बाहुल्या, पुष्ठ्याचे घर, घराच्या कोपऱ्यातील स्टॅंड, शोभेची समई, 

पिग्गी बॅंक, पंचारती अशा अनेक प्रकारच्या वस्तू त्यांनी बनवल्या आहेत. या वस्तूंना मागणीही येऊ लागली आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला असून, त्यामध्ये अधिकाधिक वैविध्य आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. याशिवाय संकेतस्थळावरून अधिक माहिती घेऊन जुन्या कपड्यापासून पायपुसण्या, पुष्ठ्यापासून कोपरे बनवण्याची कलाही त्यांनी अवगत केली आहे. दिवसभर पान शॉपमध्ये व्यवसाय करत हे काम सुरू असते. त्यांच्या देखण्या वस्तू पाहून येणारे- जाणारे लोकही अचंबित होत आहेत. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत आहेत. 

‘‘मोबाईल हे मोठे शैक्षणिक विद्यापीठ असून, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय, उद्योगधंदे शिकण्यास नक्कीच मदत होऊ शकते. त्यातून बेरोजगार युवकांच्या हातांना काम उपलब्ध होईल. त्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत ठेवून व्यवसायात उतरण्याची गरज आहे.’’ 
- प्रदीप पाटील, उंडाळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decorative ornaments making by junk paper