esakal | कोविड सेंटरला 'आम्ही म्हसवडकर'चा आधार, रुग्णांवर होणार मोफत उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Amhi Mhaswadkar Group

कोविड सेंटरला 'आम्ही म्हसवडकर'चा आधार, रुग्णांवर होणार मोफत उपचार

sakal_logo
By
सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (सातारा) : बंगळूर येथील ओम चॅरिटी इंडिया फाउंडेशनच्या वतीने अडीच लाख रुपये किमतीची औषधे "आम्ही म्हसवडकर" ग्रुपच्या वतीने (Amhi Mhaswadkar Group) लोकवर्गणीतून येथे चालविण्यात आलेल्या कोविड सेंटरला देण्यात आली. (Distribution Of Medicines To Covid Center On Behalf Of Amhi Mhaswadkar Group)

येथील शासकीय वसतिगृह इमारतीत 20 ऑक्‍सिजन बेडचे कोविड केअर सेंटर (Covid Center) सुरू असून तेथे मोफत उपचार केले जात आहेत. येथील रुग्णास औषधांची टंचाई जाणवू लागल्यामुळे लोकवर्गणीतून औषधे खरेदी करून रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. येथील कोविड केअर सेंटरमधील औषध टंचाईची माहिती मिळताच पळशी (ता. माण) येथील राष्ट्रीय स्वयंम संघ व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब खाडे यांनी "ओम चॅरिटी इंडिया फाउंडेशन'शी संपर्क साधून त्यांचेकडून अडीच लाखांची औषधे उपलब्ध करून देण्याचे योगदान दिले. यावेळी युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, डॉ. राजेंद्र मोडासे, संजय टाकणे, डॉ. राजेश शहा, लक्ष्मण सरतापे आदी उपस्थित होते.

पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरला निघालेल्या ऑक्सिजन टँकरला गळती; साताऱ्यात खळबळ

Distribution Of Medicines To Covid Center On Behalf Of Amhi Mhaswadkar Group

loading image
go to top