
पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूरला निघालेल्या ऑक्सिजन टँकरला गळती; साताऱ्यात खळबळ
सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) सातारा शहरानजीक ऑक्सिजन टँकरला (Oxygen Tanker) गळती लागली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ते लिकेज थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाव घेतली आहे. (Oxygen Tanker Leaks On Pune-Bangalore National Highway Satara News)
बुधवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला ऑक्सिजन टँकर अचानक थांबला. यावेळी टँकरमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊ लागल्याने ड्रायव्हर घाबरला. खाली उतरून पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती सुरू झाली होती. या घटनेमुळे टँकरमधील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया गेले असून ती गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पोलिस घटनास्थळी तत्काळ झाल्यानंतर ही गळती काढण्यात आली व टँकर पुन्हा मार्गस्थ करण्यात आला.
साताऱ्यात मृत्यूतांडव! जिल्ह्यात 24 तासात 58 बाधितांचा मृत्यू, तर 2376 जणांचे अहवाल Positive
Oxygen Tanker Leaks On Pune-Bangalore National Highway Satara News
Web Title: Oxygen Tanker Leaks On Pune Bangalore National Highway Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..