रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी रेठरे बुद्रुक गाव एकवटले

अमोल जाधव
Tuesday, 15 September 2020

लोकवर्गणीतून ऑक्‍सिजन मशिन पुरवणारे रेठरे बुद्रुक हे पहिलेच गाव आहे. गावाने एकत्रित येत कोविड रुग्णांसाठी ऑक्‍सिजन मिळावा, यासाठी दहा ऑक्‍सिजन मशिन घेतल्या आहेत. त्यासाठी लागणारा चार लाख रुपये निधी जमा करण्यासाठी ग्रामस्थांची एकत्रित बैठक होऊन त्यात लोकवर्गणीमधून यंत्रसामग्री घ्यायचे ठरले. या कार्यात रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे तीन मशिन देऊन बळ वाढवले.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कऱ्हाड तालुक्‍यात कोरोना रुग्णांचा वेग वाढला आहे. कोरोना संसर्गाने ग्रामीण भागालाही विळखा घातलेला आहे. रेठरे बुद्रुक गावातही रुग्णसंख्या वाढत आहे. त्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी गाव एकवटले आहे. गावाने एकत्र येऊन दहा ऑक्‍सिजन मशिन खरेदी करून त्या रुग्णसेवेत रुजू केल्या आहेत. यानिमित्ताने रेठरे बुद्रुक गावाने राबवलेला उपक्रम अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 

लोकवर्गणीतून ऑक्‍सिजन मशिन पुरवणारे रेठरे बुद्रुक हे पहिलेच गाव आहे. गावाने एकत्रित येत कोविड रुग्णांसाठी ऑक्‍सिजन मिळावा, यासाठी दहा ऑक्‍सिजन मशिन घेतल्या आहेत. त्यासाठी लागणारा चार लाख रुपये निधी जमा करण्यासाठी ग्रामस्थांची एकत्रित बैठक होऊन त्यात लोकवर्गणीमधून यंत्रसामग्री घ्यायचे ठरले. ही बाब भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले व कृष्णा अभिमत विद्यापीठाचे ट्रस्टी विनायक भोसले यांच्या कानी पडल्यानंतर रेठरेकरांच्या हाकेला साथ देत त्यांनीही गावासाठी दोन ऑक्‍सिजन मशिन दिल्या.

लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही! 

या कार्यात रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे तीन मशिन देऊन बळ वाढवले. उर्वरित मशिन लोकवर्गणीतून घेतल्या आहेत. त्या मशिन चालवण्याचे प्रशिक्षण गावातील आशासेविकांना देण्यात आले आहे. लोकवर्गणीतील रकमेचा कोरोना रुग्णांसाठी गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी आवश्‍यक साहित्याची खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution Of Oxygen Machine At Rethare Budruk Satara News