ज्ञानदेव पाटलांची सायकलवरून घरपोच भाजीपाला सेवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - भल्या पहाटं उठून तयार व्हायचं. डाल्यात (मोठे टोपले) ताजा भाजीपाला, फळे भरायचं. सायकलीच्या करिअरवर डालं पक्कं बांधून शहराकडं निघायचं. सकाळी सकाळी शक्‍य होईल तेवढ्या कॉलनीमध्ये फेरफटका मारायचा. नंतर कुठेतरी रस्त्यावर किंवा भाजीमंडईच्या आसपास उभ राहून विक्री करायची. जेवढे पैसे जमा होतील तेवढे घेऊन सायंकाळी पुन्हा गावाकडं परतायचं. बोरगावचे ज्ञानदेव सूर्यभान पाटील आपला दिनक्रम सांगत होते.

ज्ञानदेव पाटील (वय ५० वर्ष) यांचे एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असे कुटुंब आहे. पूर्वी वडिलोपार्जित थोडी शेती होती. मात्र, नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे शेती विकावी लागली. आता पुढे काय, हा प्रश्‍न होता. मजुरी केली. होईल तेवढ्या प्रकराची कामे केली. 

मात्र, त्यातून हाती काही पडतच नव्हतं. सहज एका दिवशी लक्षात आलं गावातील शेतकऱ्यांकडून शेतीमाल विकत घेऊन व्यापारी तो दुप्पट, तिपटीने बाजारात विक्री करतात. आपणही मूळचे शेतकरीच आहोत. मग आपणच का बरे थेट भाजीपाला विक्री करू नये? प्रारंभी थोडी चालढकल केली. लोकलज्जा आदी कारणांमुळे हिंमतच होत नव्हती. शेवटी एके दिवशी नाईलाजास्तव सायकलवर भाजीपाला घेऊन बोरगावहून निघालो. 

विशेष म्हणजे भाजीपाला ताजा असल्यामुळे दुपारपर्यंत विकला गेला. हाती पैसे आल्यामुळे हायसं वाटलं. मग निश्‍चय केला की, आपल्याला हाच व्यवसाय करायचा. तेव्हापासून आजपर्यंत रोज बोरगावहून सायकलवर फळे, भाजीपाला घेऊन निघतो. शहरात आल्यावर काही ठिकाणी चक्कर टाकतो. तेथे विक्री झाली, तर ठीक नाहीतर दिवसभर रस्त्यावर उभं राहून विक्री करतो. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dnyandev Patil give vegetable service