esakal | डॉक्टर-अभिनेता अन्‌ पुन्हा डॉक्टर
sakal

बोलून बातमी शोधा

Aashish-Gokhale

अभिनय हे माझे पहिले प्रेम आणि आजही ते कायम आहे. परंतु सध्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणीबाणीचा काळ आहे आणि  यासाठी रुग्णसेवा गरजेची आहे, असे मत डॉक्टर आणि अभिनेता आशिष गोखले यांनी व्यक्त केले आहे. तो सध्या खासगी रुग्णालयात चोवीस तास सेवा करत आहे.

डॉक्टर-अभिनेता अन्‌ पुन्हा डॉक्टर

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई - अभिनय हे माझे पहिले प्रेम आणि आजही ते कायम आहे. परंतु सध्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणीबाणीचा काळ आहे आणि  यासाठी रुग्णसेवा गरजेची आहे, असे मत डॉक्टर आणि अभिनेता आशिष गोखले यांनी व्यक्त केले आहे. तो सध्या खासगी रुग्णालयात चोवीस तास सेवा करत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोनी दूरत्रिवाणीवरची तारा फ्रॉम सातारा या मालिकेत अभिनेता गोखले हा अखेरचा दिसला होता. त्यात त्याने वरुण मानेची भूमिका वठविली होती. तो आता रुग्णसेवेत आहे. यादरम्यान तो अभिनेता अक्षय कुमारच्या गब्बर इज बॅकमध्येही तो दिसला होता. मोगरा फुललामध्येही आशिष गोखलेची भूमिका होती. २०१५ मध्ये त्याने कुकुम भाग्य येथे अभिनयाच्या क्षेत्रात पाउल टाकले. तत्पूर्वी तो कोकण विभागात वैद्यकीय व्यवसाय करत होता. पाच वर्षापूर्वी तो मुंबईला स्थलांतरित झाला. जुहूतील एका रुग्णालयात नोकरी करत असताना गोखले यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीवरून अभिनय पुन्हा सुरू केला.

यासंदर्भात तो म्हणतो, की लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी मी दिवसा शूटिंग करत असे आणि रात्री मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात काम करत असे. शेवटची शूटिंग ही १४ मार्च रोजी केली होती. परंतु आता मी डॉ. आशिषच्या भूमिकेत आहे. ही भूमिका पार पाडताना मला फार अडचणी येत नाही. मी पाच वर्ष अभ्यासक्रम केला असून प्रॅक्टिसही केली आहे. कोरोना व्हायरसमुळे मी सध्या चोवीस तास उपलब्ध आहे. सध्याची स्थिती काळजीची असली तरी घरातच राहणे ही सर्वात चांगला मार्ग आहे, असेही तो म्हणतो.

loading image