95 वर्षीय शेतकरी दोरवे यांचे देहदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

दोन अंधांना मिळाली दृष्टी : डोमाजी दोरवेंचा समाजासमोर आदर्श 

नागपूर : वय वर्ष 95 असलेले शेतकरी डोमाजी दोरवे यांनी मृत्यूनंतर केलेल्या नेत्रदानामुळे दोन अंध बांधवांच्या डोळ्यांत दाटलेला काळोख दूर झाला. त्यांच्या नेत्रदानातून मिळालेल्या प्रकाशाने दोन्ही अंध दृष्टीआडची सृष्टी बघू लागले आहेत. नेत्रदानसोबतच त्याचा देह मेडिकलमध्ये दान करण्यात आला. विशेष असे की, काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:च देहदानाची इच्छा बोलून दाखविली होती. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले. 

वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेले अनेक जण अवयव दानाचा सल्ला नेहमीच देतात. परंतु, वडिलांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा सन्मान मेडिकलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम डोमाजी दोरवे यांनी राखला. सोमवारी सकाळी डोमाजी यांचा मृत्यू झाला. तत्काळ मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांना मोबाईलवरून संपर्क करीत वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगताच मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे वैद्यकीय पथक तत्काळ दोरवे यांच्या घरी पोहोचले.

नेत्रदान स्वीकारल्यानंतर लगेच स्वीकारण्यात आलेले नेत्रप्रतीक्षा यादीनुसार दोन अंध बांधवांच्या डोळ्यांत पेरले. डोमाजी यांची देहदानाची इच्छा मुलाने पूर्ण केली. यावेळी नातेवाइकांनी काटोल येथील रिधोरा गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी जोर धरला होता. परंतु, मुलाने वडिलांची देहदानाची इच्छा होती ती पूर्ण करू द्या, अशी विनंती नातेवाइकांना केली. त्यानुसार, चार बहिणी आणि भाऊ साऱ्यांनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार, मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद फुलमाळी, सहयोगी प्राध्यापक डॉ. तारकेश्‍वर गोडघाटे यांनी देहदान स्वीकारले आणि तसे प्रमाणपत्र दिले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्‍टर उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donation of the body of 95 year old farmer Dorwe