वापरात नसलेल्या सायकली पुनर्वापरासाठी दान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

कोथरूड परिसरातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील सभासदांनी अडगळीत व गंजखात पडलेल्या सुमारे पन्नास सायकली गोळा करून त्या पुनर्वापरासाठी परिवर्तन सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केल्या. परिवर्तन संस्था या सायकली स्वखर्चाने दुरुस्त करून त्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत देत आहेत.

वारजे - कोथरूड परिसरातील स्वप्नशिल्प सोसायटीमधील सभासदांनी अडगळीत व गंजखात पडलेल्या सुमारे पन्नास सायकली गोळा करून त्या पुनर्वापरासाठी परिवर्तन सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केल्या. परिवर्तन संस्था या सायकली स्वखर्चाने दुरुस्त करून त्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत देत आहेत.

सोसायटीमधून सायकली शोधून त्या गोळा करण्यासाठी अध्यक्ष दिलीप देशपांडे, प्रसाद भोलागीर व सत्यजित चितळे यांनी परिश्रम घेतले. वेल्हा तालुक्‍यातील छोटी गावे तसेच मांडवी व इतर जवळपास गावांमधील विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास कालिदास मोरे, मिला गरुड, व्यवस्थापक श्रीनिवास मेहेंदळे तर परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष अभिजित घुले व किशोर ढगे आदी उपस्थित होते.

सोसायटीमध्ये जुन्या सायकली अनेक दिवसांपासून तशाच पडून होत्या. त्याचा वापर होतकरूंसाठी व्हावा याच उद्देशाने या सायकली परिवर्तन संस्थेला दिल्या आहेत. या सायकली दुरुस्त करून योग्य व्यक्तीपर्यंत पोचविल्या जाणार आहेत, असे मोरे यांनी सांगितले.

Web Title: Donation for non bicycling recycling Motivation Initiative

टॅग्स