जगण्याच्या ऊर्मीपुढे मृत्यूही ओशाळला !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे - माझ्या जिवावर बेतलेल्या संकटाशी एक-दोन महिने नाही, तर सलग तीन वर्षे आम्ही झगडत होतो. प्रकृती कधी खालावत, तर कधी सुधारत होती. कधी-कधी उद्याचा सूर्य बघता येईल की नाही, इतपत मी अत्यवस्थ होत होते. अखेर तीन वर्षांनंतर मरणोत्तर दान केलेले यकृत मला मिळाले; पण हे तीन वर्षे प्रत्येक क्षणी जगण्याची ऊर्मी देणाऱ्या डॉक्‍टरांचे मनःपूर्वक आभार मानते...

खरं तर दाताचे उपचार करायला गेले होते. त्या वेळी उपचार करताना आलेले रक्त काही केल्या थांबेना. अखेर डॉक्‍टरांनी रक्त तपासण्याचा सल्ला दिला. त्या वेळी वजनही झपाट्याने कमी होत होते. त्यामुळे सोनोग्राफीही केली. त्यातून यकृताचा आजार झाल्याचे निदान झाले; पण पुढे-पुढे या आजाराने रुद्रावतार धारण केला. माझ्या आयुष्यातील एक-एक श्‍वास कमी होतोय, अशी जाणीव होऊ लागली...

यकृताच्या दुर्धर आजाराशी तीन वर्षे संघर्ष करून त्यावर विजय मिळविणाऱ्या सुवर्णा बोलत होत्या. घरातील सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मी नसेल तर... हा प्रश्‍न भेडसावत होता. नवऱ्याचे काय, आई-वडील, सासू-सासरे या सर्वांची काळजी घेणार कोण, असे प्रश्‍न उभे राहात होते. तुला या आजाराशी लढून जिंकायचे, हे एक आणि एकच उत्तर मिळत होते. हे उत्तर शोधण्यात पावलो-पावली मदत करणाऱ्या यकृत प्रत्यारोपण डॉ. शीतल धडफळे-महाजनी आणि डॉ. मनीष वर्मा यांची मदत झाली. कारण, यकृत मिळेपर्यंत तीन वर्षे मला जीवदान देण्याचे काम या डॉक्‍टरांनी केले आहे. 
(क्रमशः)

Web Title: Dr. Sheetal Dhadphale-Mahajan and Dr. Manish Verma help suvarna

टॅग्स