शिकण्याच्या जिद्दीला सलाम!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे - आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही, शिकण्याची जिद्द ठेवल्यास मदतीसाठी हजारो हात पुढे येतात, याची प्रचिती पूना नाइट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेजच्या बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आली. पुणे विभागातून रात्रशाळांच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवलेला आकाश धिंडले याच्यासह दहा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत मिळाली. 

डॉ. मोहन गुप्ते यांच्यावतीने आकाशला पुढील शिक्षणासाठी १५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला, तर ‘द पॉवर ऑफ वन एज्युकेशन ट्रस्ट’च्यावतीने दहा विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.   

गुप्ते म्हणाले, ‘‘मी या शाळेच्या संपर्कात असतो. गरीब व होतकरू मुलांचे पैशांअभावी शिक्षण थांबता कामा नये, ही माझी भूमिका आहे. ’’ 

द पॉवर ऑफ वन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद नारायण म्हणाले, ‘‘आम्ही मागील वर्षी तीन मुलांना आर्थिक मदत केली होती. या वर्षी ही संख्या वाढवली आहे.’’

प्राचार्य अविनाश ताकवले म्हणाले, की ‘सकाळ’ने रात्रशाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य देण्यासंबंधात आवाहन केले होते. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

दिवसभर कॉस्मेटिकच्या दुकानात काम करून, संध्याकाळी साडेसहाला शाळेत येत होतो. रात्री अकरा ते दोन अभ्यास केला. शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. पुढील शिक्षणासाठी आर्थिक साह्य मिळाल्याने प्रोत्साहन मिळाले.
- आकाश धिंडले, विद्यार्थी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education night school student financial help