‘बीपीओ’ने दिले हाताला काम

BPO
BPO

कोल्हापूर - एखादा विद्यार्थी पदवीधारक झाला; पण नोकरीचे काय? असा प्रश्‍न पडायचा. आजही तरुणांना नोकरीबाबत फार काही संधी आहेत, अशातला भाग नाही. पदवीनंतर करायचे काय, हा प्रश्‍न कायम आहे. मात्र सात-आठ वर्षांपूर्वी बीपीओ (बिझनेस प्रोसेसिंग आऊटसोर्सिंग) ही संकल्पनाच नवी होती. आज याच बीपीओने शेकडो तरुणांच्या रोजगाराचा प्रश्‍न मिटविला आहे. शहरात सुमारे साडेतीन ते चार हजार तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे.

डाटा ऑपरेटिंगचे काम रात्रपाळीत चालते. बहुतांश काम बॅंकिंग क्षेत्राशी निगडित आहे. अमेरिकेत दिवस असतो त्यावेळी भारतात रात्र असते. त्यामुळे काम रात्रपाळीत चालते. बीपीओचे नियम कडक आहेत. एखादा कर्मचारी मोबाईल तर दूरच, साधे पेनसुद्धा सेंटरमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. ज्या मजल्यावर त्याची नियुक्ती आहे तेथेच त्याला प्रवेश मिळतो.

ओळखपत्रात विशिष्ट प्रकारची चीप असते. ओळखपत्र काचेच्या दरवाज्याला लावल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची खात्री झाल्यानंतरच दरवाजा उघडतो. सात-आठ वर्षांपूर्वी बीपीओ सुरू झाले, त्यावेळी दहावी अथवा बारावीची मूळ प्रमाणपत्रे कंपनीकडून ठेवून घेतली जात होती. वर्षाच्या बॉन्डवर नोकरी दिली जायची.

आता किमान पदवीधर आणि इंग्रजी टायपिंगची विशिष्ट गती असे निकष आहेत. बीपीओत व्हाईट रूमचा ॲक्‍सेस आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचा चुकून डोळा मिटला तर कंपनीला पेनल्टी बसते. कर्मचाऱ्याच्या प्रोत्साहन भत्त्यात कपात होते.

शहरात एसएलके, स्कायलार्क आणि गॅलिअर असे तीन मोठे बीपीओ आहेत. सुमारे साडेतीन हजार तरुण कामाला आहेत. कोल्हापूरसह सांगली, निपाणी, गडहिंग्लज, सीमाभागातून दररोज ये-जा करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. एक शिफ्ट नऊ तासांची आहे. आठवड्यातील शनिवार आणि रविवारी सुटी असते. शनिवारी एखादा कर्मचारी रात्रपाळीला असेल तर सोमवारी तो पुन्हा रात्रपाळीला येतो. तीन दिवस कर्मचाऱ्यास विश्रांती मिळावी असा हेतू आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑपरेटिंगचे लक्ष्य दिले जाते.

बीपीओच्या निमित्ताने तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. महिन्याला सुमारे १२ ते १३ हजार रुपये मिळतात. कोल्हापूरची मुले कामाला चांगली आहेत, असा संदेश कंपन्यांपर्यंत पोचला आहे. दररोज शंभर किलोमीटरवरून येणारी मुलेही आहेत. शिस्त आणि वेळ पाळली की नोकरीतही अडचण नाही.
- अनिकेत पाटील, एसएलके बीपीओ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com