अंध मुलांसाठी उजळला प्रकाशाचा रंग..!

अंध मुलांसाठी उजळला प्रकाशाचा रंग..!

कोल्हापूर - दृष्टी नाही, एक दृष्टिकोन आहे. अंधार असला तरी प्रकाशाकडे जाण्याची शक्ती आहे. आवाजाची अशी एक ताकद आहे, जी काळजाचा ठाव घेणारी आहे...ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुले आत्मविश्‍वासानं बोलत होती. विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधील १४० माजी विद्यार्थ्यांनी येथील तीन मुलांना दत्तक घेतले असून, त्यांच्या कलात्मक प्रवासालाही त्यांनी बळ दिले आहे. 

सिध्दराज पाटील आजचा आघाडीचा गायक. अगदी ‘सारेगमप्‌’ शोमध्ये जावून अनेक स्पर्धकांशी सकस स्पर्धा केलेला. विनायक पाटील गायक आणि निवेदनाचीही त्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. विजय लाखे म्हणजे तालवाद्यांचा बादशाह. या तीन मुलांची सर्व प्रकारची शैक्षणिक फी, विनायक व विजयच्या होस्टेलचा खर्च माजी विद्यार्थी संघ करतो. त्याशिवाय प्रत्येक सणाला ही मंडळी एकत्र येवून एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात. अंध मुलांच्या वाद्यवृंदातील सिध्दराज, विनायक आणि विजय हुकमी एक्के असून त्यांचा कलाविष्कार म्हणजे टाळ्यांची बरसात, हेच समीकरण आता झाले आहे. 

माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून एकत्र यायचे आणि स्नेहभोजन व मनोरंजनाचे कार्यक्रम करायचे, या प्रथेला आता फाटा देत विविध सामाजिक उपक्रमांवर भर दिला जावू लागला आहे. गेल्या वर्षी ‘भक्ती सेवा विद्यापीठ’च्या या माजी विद्यार्थ्यांनी तीन अंध मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांनी पुढची सर्व जबाबदारी स्वीकारली. डॉ. आसिफ सौदागर, दिलीप टिपुगडे, विशाल माणगावे,अनिल पाटील, आरिफ मणेर, रणजीत सावंत, उल्हास यादव,चंदू नासीपुडे, राहूल गोगटे, किशोर रोकडे, फिरोज आरवाडे, संतोष पोवार, उदय पोवार, राहूल मगदूम, सुनील वायंगणकर, सुधीर कोठावळे, स्वाती बेलवलकर, संगीता साडविलकर, शुभांगी भोसले, विद्या मोरे, मीरा गवळी आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला असल्याने अंध मुलांचा प्रवासाला अधिकच  बळ आले आहे.

आम्हाला सहानुभूती नको, संधी हवी असते. ‘भक्ती सेवा विद्यापीठ’च्या माजी विद्यार्थ्यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे आम्ही तिघे नक्की सोनं करू.
- सिद्धराज पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com