शेततळ्यातील पाण्याने भागवली तहान...

सचिन निकम
गुरुवार, 20 एप्रिल 2017

अमृत निंबाळकर यांच्यामुळे लेंगरे गावातील पाण्याचा प्रश्‍न निकाली
लेंगरे - पाणी हे मानवाचे जीवन आहे. पाणी हे अमृतापेक्षाही महत्त्वाचे आहे. हे लेंगरेच्या अमृतराव निंबाळकरांनी दाखवून देत सामाजिक बांधलिकी  जपण्याचे काम त्यांनी केले. दुष्काळाने त्रस्त झालेल्या लोकांना आपल्या शेतातील तलावातील एक कोटी लिटरचा पाण्याचे अमृत कुंड खुले करून दिले आहे. ग्रामपंचायतीने शेततलावातील पाणीपुरवठ्याच्या  विहिरीत सोडल्याने नियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लेंगरेकरांची पाण्यासाठी होणारी फरफट काहीशी थांबणार आहे. 

गावातील सुमारे ५ ते ६ हजार लोकांचे पाण्यासाठी होणारी लाहीलाही थांबणार आहे. त्यांनी गावासाठी केलेल्या कार्याचे कौतुक परिसरात होत आहे. भागात दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला मात्र   लेंगरेतील अमृतराव निंबाळकरांनी यावर मात करत पाणी साठ्यासाठी शेतातच शेतीच्या पाण्यासाठी दोन कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव बांधला. या पाण्याचा त्यांनी पुरेपूर शेतीसाठी वापर करून शेतीचा विकास केला.  लेंगरे परिसरात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. गावाला ज्या ढोराळे तलावातून केला जात होता. त्यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे लेंगरेकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. प्रशासनाकडून केवळ तीन पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून केला जाणारा पाणीपुरवठा पुरत नव्हता. 

या पाणीप्रश्नामुळे जनावरांच्या चारा टंचाई जाणवू लागली होती. ही सगळी लेंगरेकरांची परवड पाहून निंबाळकरांनी आपल्या शेतातील पाणी गावाला देऊन त्यांची तहान भागवण्याचे काम त्यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farm lake water meets thirst ...