मुलांसाठी सोडली त्यांनी शेती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

टाकवे बुद्रुक - अत्यल्प शेती, तीही पावसाच्या भरवशावर... लेकरांचं पोट भरायला त्यांनी गाव सोडलं आणि मुंबईची वाट धरली...आईने धुणीभांडी, तर वडिलांनी माळीकाम केले...चार लेकरांचं पोट भरता भरता त्यांना सरकारी शाळेतून शिक्षणही दिले. आई-वडील दोघे अशिक्षित. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुली शिकल्या. तर, मुलगा एमबीबीएस होऊन आंदर मावळातील पहिला डॉक्‍टर झाला.

विक्रम तानाजी वाडेकर असे या डॉक्‍टर मुलाचे नाव. तर, तानाजी वाडेकर असे अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव. विक्रमने नुकतीच मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. सध्या तो येथेच इंटर्नशिप करतोय. 

घरची शेती पावसाच्या भरवशावर होती म्हणून तानाजी वाडेकर यांनी तीन मुली, एक मुलगा व पत्नीला घेऊन नोकरीसाठी मुंबई गाठली. तत्पूर्वी विक्रम वाहनगावच्या जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकत होता. त्यानंतर त्याने मुंबईला विक्रोळी पार्क साईटला महापालिकेच्या शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीची परीक्षा व्यंकटेश विद्यानिकेतनमधून दिली. दहावीला ९१ टक्के व बारावीत विज्ञान शाखेतून ८० टक्के गुण मिळविले. पुढे एफएसआयटीच्या परीक्षेत त्याला ४७३ गुण मिळाले. या जोरावर त्याला मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळाला. साडेचार वर्षांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. मुलाने कष्टाचे चीज केले, अशी आई आशाबाई आणि वडील तानाजी यांची भावना आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Son Vikram Wadekar Doctor Motivation Success