गारगोटवाडीत थांबली पाण्यासाठीची भटकंती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

गारगोटवाडी (ता.खेड) येथील ग्रामपंचायत सदस्य सावळाराम गारगोटे यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या शेतीचे पाणी सार्वजनिक विहिरीत पदरमोड करून आणून सोडले. तीव्र पाणी टंचाईच्या काळात दैनंदिन वापराच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गारगोटे यांच्यामुळे गैरसोय दूर झाली आहे. त्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे ग्रामस्थ व महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

कडूस - गारगोटवाडी (ता.खेड) येथील ग्रामपंचायत सदस्य सावळाराम गारगोटे यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या शेतीचे पाणी सार्वजनिक विहिरीत पदरमोड करून आणून सोडले. तीव्र पाणी टंचाईच्या काळात दैनंदिन वापराच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गारगोटे यांच्यामुळे गैरसोय दूर झाली आहे. त्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे ग्रामस्थ व महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे.

कुमंडला नदीवरील बंधाऱ्यात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने बंधाऱ्यालगतच्या पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठल्याने परिसरात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची सुरू असलेली भटकंती पाहून गारगोटे यांनी पुढाकार घेतला व त्यांनी आपल्या शेतीचे पाणी सार्वजनिक विहिरीत आणून सोडले. विहीर पाण्याने काठोकाठ भरल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. 

स्वत: केला हजार फूट पाइपचा खर्च 
गारगोटे यांनी शेतापासून विहिरीपर्यंत सुमारे एक हजार फूट लांब पाइप जोडणी केली आहे. यासाठी परिश्रम घेऊन हजार फूट पाइपचा खर्च गारगोटे यांनी स्वतः केला. पुण्यात स्थायिक असलेले त्यांचे बंधू व चार्टर्ड अकाउंटंट किसन गारगोटे यांनी या कामी मोलाचे साहाय्य केले. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी कोंडीभाऊ गारगोटे, एकनाथ गारगोटे, सरपंच अश्विनी बच्चे, उपसरपंच राहुल गारगोटे, ग्रामपंचायत सदस्य नेहा गारगोटे, सीमा गारगोटे यांनी गारगोटे यांना विशेष मदत केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farming water through social commitment to public wells in gargotwadi