गोरे प्रतिष्ठानतर्फे पाच टॅंकरने पाणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

बिजवडी - माण तालुक्‍याच पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरे यांनी शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानतर्फे माण-खटाव तालुक्‍यांतील टंचाईग्रस्त गावे व वाड्यावस्त्यांना पाच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. या दोन्ही तालुक्‍यांत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांना डिझेलसह मोफत मशिनरी देऊन टंचाई निवारणासह जलसंधारणाच्या कामातही प्रतिष्ठानने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने २०१२ पासून टंचाईच्या ठिकाणी मागेल त्यांना त्वरित टॅंकर पाठवला जातो. गेली पाच वर्षे टंचाई काळाबरोबरच यात्रा असलेल्या गावात आणि वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्याचे कामही प्रतिष्ठान करताना दिसून येते. यात्राकाळात मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ व भाविकही प्रतिष्ठानच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करत आहेत. टॅंकरप्रमाणेच जलसंधारणाच्या तसेच विविध रस्त्यांच्या कामांसाठी पाच वर्षे डिझेलसह पोकलेन, जेसीबी मशिन प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जात आहेत. दोन्ही तालुक्‍यांत रोज हजारो ग्रामस्थ आपले गाव पाणीदार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेऊन श्रमदान करताना दिसून येत आहेत. अनेकांनी फक्त मशिनरी दिल्या असून, त्यात डिझेल ग्रामस्थ टाकत आहेत. मात्र, शेखर गोरेंनी सहा पोकलेन व दोन जेसीबी मशिन डिझेलसह मोफत दिल्याने प्रत्येक गावातील जलसंधारणाच्या कामांना गती मिळाली आहे. या कामात ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे श्रमदानात सहभागी झाल्याने त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी गोरेंनी कामांना भेटी देत प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five tanker water by Gore establishment