ThursdayMotivation : अणदूरच्या शिक्षकांनी शाळा घेतली दत्तक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

अणदूरसह परिसरातील विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी आर्थिक मदत जमा करून वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार ही दत्तक घेतली आहे. वर्षभरात शाळेला लागणारी स्टेशनरी, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

अणदूर - येथील प्राथमिक शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीतून एकत्रित येत पूरग्रस्त सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली आहे.

अणदूरसह परिसरातील विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी आर्थिक मदत जमा करून वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार ही दत्तक घेतली आहे. वर्षभरात शाळेला लागणारी स्टेशनरी, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वह्या, पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

त्यानिमित्त पहिल्या टप्प्यात ३५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले आहे. पुराचा फटका बसलेल्या ब्रह्मनाळ गावाला भेट देण्यासह ग्रामस्थांना साहित्य भेट देण्यात आले. केंद्रप्रमुख पी. के. राठोड, मुख्याध्यापक काशीनाथ देडे, लक्ष्मण बारगळ, उमेश नांदगाये, भीमाशंकर घंटे, राहुल जाधव, सिद्राम साखरे, दयानंद चक्रे, हनुमंत गंठोड, राजेंद्र लोहार, सिद्राम गवळी, काशीनाथ भालके, दशरथ शेळके, अभयसिंह जाधव, सचिन ढेपे, सिद्धार्थ कांबळे, श्‍यामसुंदर गोरे, यशवंत मोकाशे, विजयकुमार गायकवाड, धुळाप्पा शिदोरे, अण्णाप्पा सर्जे, गुरुलिंग ढावणे, भरत महाबोले, दगडू सालेगावे, प्रा. राजेंद्र वडजे, खंडू व्हनाळे आदी शिक्षकांनी मदत केली आहे. या मदतीबद्दल शिक्षक बांधवांचे कौतुक होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected School Adopt by Anadur Teachers Motivation