विद्यार्थ्यांच्या मोफत जेवणासाठी सातशे ‘अन्नपूर्णा’

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

पुणे - आपत्ती कोणतीही असो, पुणेकर मदतीसाठी नेहमीच पुढे असतात. याचा प्रत्यय कोरोना आपत्तीतही दिसत आहे. पुण्यात शिक्षणासाठी परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण देण्यासाठी पुढे आलेल्या अन्नपूर्णांची संख्या सातशेवर गेली आहे. या उपक्रमाद्वारे आतापर्यंत शंभर विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील हॉटेल्स, खानावळी बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे पुण्यात शिक्षण घेत असलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांची जेवणाची अडचण होऊ नये; म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नंदू फडके यांनी विद्यार्थ्यांना जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला. यात पुणेकरांना सहभागी करून घेतले आहे. पुणेकरांनी त्यास प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना जेवण देण्यास सुरुवात केली आहे.

फडके म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत. आतापर्यंत अन्नपूर्णा गटात सातशे नागरिकांनी नोंदणी केली आहे; तसेच ज्यांना जेवण हवे अशा म्हणजे अनिकेत गटात शंभर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यांना जेवण देण्यास सुरुवात केली आहे.’’

हॉटेल आणि खानावळी बंद असल्याने ज्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे, त्यांनी अनिकेत गटात ई-मेलद्वारे नोंदणी करावी. त्यात संबंधितांनी मोबाईल नंबर द्यावा. यामुळे त्यांची जेवणाची व्यवस्था त्या त्या भागात करणे शक्‍य होईल. विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांनी त्यांच्या घरीही विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था करण्याचे मान्य केले आहे, असे फडके म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free meals for students of seven hundred Annapurna

Tags
टॉपिकस
Topic Tags: