
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यावर मोठे संकट ओढावले आहे. याच पार्श्वभूमीवर 'मीच माझा रक्षक' या सामाजिक संस्थेच्यावतीने सवयभान अभियानाद्वारे कोरोना संकटकाळात साता-यातील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक हा उपक्रम सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात १० ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्या गरजू रुग्णांना घरपोच दिल्या जाणार आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव साऱ्यांची डोकेदुखी होवून बसला आहे. मार्च महिन्यात अगदी सप्टेंबरपर्यंत कोरोनाने जिल्ह्यातील जनजीवन अक्षरश: भेदरून गेले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना सक्षमपणे राबवत असल्या, तरी बाधित व मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या स्थितीचा आढावा घेवून जिल्हाप्रशासनाने रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, त्या तोकड्या पडू लागल्या आहेत. बेडअभावी रुग्णांचे जीव जात आहेत. याच पार्श्वभूमीवर 'मीच माझ्या सातारकरांचा रक्षक' या संस्थेच्या माध्यमातूनही असाच एक अत्यावश्यक उपक्रम सवयभानच्या माध्यमातून राबवला जात असल्याची माहिती राजेंद्र चोरगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना चोरगे म्हणाले, गेले चार महिने सवयभानच्या माध्यमातून सातारकरांसाठी कोरोना संकटकाळात जनजागृती केली जात आहे. सातारकरांसाठी आता ऑक्सिजनचा मोफत पुरवठा हे आणखी एक पाऊल आम्ही टाकत आहोत. मिशन ऑक्सिजन या नावाने आम्ही ही योजना राबवत आहोत. ज्या कुणाला ऑक्सिजनची गरज आहे. ज्या गरजू रुग्णांना इमजन्सी ऑक्सिजनची गरज आहे. त्यांच्या घरी ऑक्सिजन पुरवला जाईल. त्याव्दारे रुग्णांचे जीव वाचवण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत.
प्राथमिक शिक्षकांच्या बदलीत गैरव्यवहार?; जिल्हा परिषदेत सभेत गदाराेळ
सातारकरांनी मार्च महिन्यापासून सवयभान अभियान पाहिले आहे. पहिल्या टप्प्यात या अभियानाव्दारे ऑक्सिजन चेकिंग, टेम्परेचर चेकिंग मोहीम राबवण्यात आली. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या देण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोना संकटात जगायचे कसे? याद्वारे आम्ही संपूर्ण जगात पोहोचलो. सध्या सातारा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन बेड व यंत्रणा कमी पडत आहे. हॉस्पिटल मिळत नाहीत, केवळ ऑक्सिजन घेण्यासाठी रूग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे आम्ही ठरवले की सातारकर रूग्णांसाठी ऑक्सिजन बँकच तयार करू, सवयभान ऑक्सिजन बँक या नावाने आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ज्या रुग्णांना गरज आहे, त्यांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांचे सर्टिफिकेट आणावे. त्याचबरोबर ओळखीचे एक शिफारस पत्र असावे. त्यांना ती मशिन आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. दोन ते तीन दिवसच ऑक्सिजनची गरज असते. त्यानंतर ऑक्सिजन लेव्हल पूर्वपदावर येते. त्यामुळे पुन्हा ऑक्सिजनची गरज लागत नाही. त्या लेव्हलला येईपर्यंत ऑक्सिजन मशिन त्यांच्या घरीच राहिल. त्यानंतर त्या रूग्णांनी आम्हाला फोन करावा, आमचा माणूस येवून ती मशिन घेवून जाईल. अशा पद्धतीने आम्ही १० ऑक्सिजन मशिन उपलब्ध केल्या आहेत. पुढे जावून आम्ही ५० ऑक्सिजन मशिनपर्यंत पोहोचण्याच्या विचारात आहोत, असेही राजेंद्र चोरगे यांनी शेवटी सांगितले.
भारतातल्या संस्थांसाठी सवयभान ठरतंय आयडॉल!
कोरोना विषाणूची दाहकता इतकी वाढली आहे, की अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. सवयभान अभियानाद्वारे कोरोना रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सिजनअभावी रूग्णांचे हाल होवू नयेत, त्यांना रूग्णालयात दाखल होण्याची गरज भासू नये यासाठी ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून गरजू रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होवून रूग्णालयात दाखल होण्याची गरज भासणार नाही. भारतातल्या अनेक संस्थांसाठी सवयभान अभियान आयडॉल ठरले आहे. या सवयभान अभियानाद्वारे ऑक्सिजन बँक उपक्रम राबवला आहे. या अभियानात ज्या कोणाला सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.