मैत्री असावी तर अशी! चितळीकरांसाठी थेट लंडनहून 'ऑक्‍सिजन'

युकेस्थित मित्राचे असेही दातृत्व; नागरिकांत समाधान
Chitli Vikas Manch
Chitli Vikas Manchesakal

मायणी (सातारा) : मैत्रीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याच्या हेतूने लंडनस्थित एका मित्राने चितळीकर नागरिकांसाठी थेट लंडनहून (London) ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन (Oxygen Concentrator Machine) पाठवून दिल्या आहेत. त्यामुळे चितळी येथील कोरोनाबाधितांना (Corona Patient) दिलासा मिळणार असून, नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खटाव तालुक्यातील चितळीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसला. केवळ ऑक्सिजन व बेड वेळेवर उपलब्ध झाले नसल्याने अनेकांच्या जिवावर बेतले. या भयावह परिस्थितीत लोकांना आधार देण्यासाठी, आवश्यक मदत करण्यासाठी नेहमीच चितळी विकास मंचचे (Chitli Vikas Manch) सामाजिक कार्यकर्ते झटतात.

Summary

मैत्रीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याच्या हेतूने लंडनस्थित एका मित्राने चितळीकर नागरिकांसाठी थेट लंडनहून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन पाठवून दिल्या आहेत.

दिवसेंदिवस तेथे वाढणारी कोरोना बधितांची संख्या व त्यांना उपचार मिळण्‍यात येणाऱ्या अडचणीची माहिती मंचचे संस्थापक यशोवर्धन पवार यांनी लंडनस्थित रवींद्र गाडगीळ या त्यांच्या मित्राला दिली. श्री. गाडगीळ हे युकेमधील महाराष्ट्र मंडळ संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले. मैत्रीची वीण अधिक घट्ट करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी तातडीने होकार दिला. संकटकाळात आपणही खारीचा वाटा उचलावा, या भावनेने श्री. गाडगीळ यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या चार मशिन्स चितळीत पाठवून दिल्या. त्या मशिन पाहून विकास मंचचे कार्यकर्ते व नागरिकही अचंबित झाले.

Chitli Vikas Manch
'माणदेशी'ने घेतली काळजी! खटावात 3 हजार महिलांचे लसीकरण

मंचाचे कार्यकर्ते पृथ्वीराज पवार, महादेव शिंदे, देवेंद्र शहा, संतोष पवार आदींनी त्या मशिन मायणी प्राथमिक आरोग्य केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार तुरुकमाने यांच्याकडे हस्तांतरित केल्या. त्यावेळी मंचाचे मार्गदर्शक व निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजीराव पवार, दंत चिकित्सक डॉ. अमोद चोथे व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी अनेकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गरजेनुसार सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com