नागरिकांनी छपरातील पाणी उतरविले विहिरीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

गोंदिया - यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळाचे सावट आहे. याशिवाय भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती ओळखून पाठक कॉलनी गणेश उत्सव मंडळाने ‘पाणी बचाओ’ अभियान राबविले. याचाच एक भाग म्हणून या कॉलनीतील नागरिकांनी घराच्या छपरातील पावसाचे पाणी सरळ विहिरीत उतरविले. या उपक्रमाचे शहरवासींनी कौतुक केले.

गणेशोत्सवादरम्यान सामाजिक दायित्व जोपासणे हे कर्तव्य समजून पाठक कॉलनीतील गणेश उत्सव मंडळाने हे अभियान राबविले. मंडळाचे अध्यक्ष सचिन अग्रवाल यांनी पाण्याचा हवा तिथेच वापर करावा, अनावश्‍यक ठिकाणी पाणी खर्च करू नये, असे आवाहन केले. विनोद कुकडे, प्रकाश आगाशे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयावर प्रोजेक्‍ट तयार केला. पाणी रिसायकल करून पिण्याचे पाणी, शेती, बगीचा व वाहन धुण्यासाठी होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मंडळातील इतर विद्यार्थ्यांनी ‘इको फ्रेंडली वातावरण’ या विषयावर प्रोजेक्‍ट तयार केला. तसा संदेश भाविकांना दिला. अभियानासाठी सोनू सेंगर, गणेश पाठक, शीतला गुप्ता, यादव फरकुंडे, पदम अग्रवाल, रितेश सोनकुसरे, दीपक दुबे, अंकित अजनीकर आदी सदस्यांनी सहकार्य केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia news water Rain Water Harvesting