गोरखनाथ मोरे यांनी तब्बल दहा हजार तरुणींना दिले स्वसंरक्षणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

शाळा, महाविद्यालयातील मुली तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या छेडछाडीचा सामना करावा लागतो. अनेकदा त्याचा प्रतिकार होत नसल्याने त्यातून दुर्घटना घडते. त्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी व्यक्ती, संस्था पुढाकार घेतात. चिखलीतील अशाच एका ध्येयवेड्याने आजवर सुमारे दहा हजार तरुणी, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत.

चिखली - शाळा, महाविद्यालयातील मुली तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या छेडछाडीचा सामना करावा लागतो. अनेकदा त्याचा प्रतिकार होत नसल्याने त्यातून दुर्घटना घडते. त्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी व्यक्ती, संस्था पुढाकार घेतात. चिखलीतील अशाच एका ध्येयवेड्याने आजवर सुमारे दहा हजार तरुणी, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गोरखनाथ मोरे असे त्यांचे नाव असून त्यांनी तलवारबाजी, लाठीकाठी, कराटे, धावणे या खेळाबरोबरच अचानक समोर आलेल्या संकटाचा सामना कसा करायचा? याचे प्रशिक्षण दिले आहे. शाळकरी मुलींबरोबरच गृहिणी, महिला पोलिस कर्मचारी, शिक्षक, कामगार आदी महिलांचा त्यात समावेश आहे. या प्रशिक्षित मुलींनी अपप्रवृत्तीचा सामना करत संकटाचा मुकाबला केला आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गुंड मुलांच्या टोळक्‍याने वर्गातील एका हुशार मुलीला त्रास दिला. त्याला कंटाळून तिला शिक्षण सोडावे लागले. त्यामुळे तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला. तेव्हापासून मुलींना अशा अपप्रवृत्तीचा सामना करता यावा, यासाठी काम करण्याचे मोरे यांनी ठरविले. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याअगोदर मोरे यांनी स्वतः प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षांपासून चिखलीतील दादा महाराज नाटेकर विद्यालयाच्या मैदानावर ते महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देत आहेत. मोरे यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या अनिता (नाव बदलले आहे) या महाविद्यालयीन तरुणीची बाहेरील काही मुले छेड काढण्याचा प्रयत्न करत होते. तिने त्यांना चांगलाच चोप दिल्यावर ते टोळके पुन्हा त्या परिसरात दिसले नाही. चिखलीतील दुसऱ्या एका युवतीने दोन वर्षांपूर्वी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात आलेल्या तीन चोरांना चोप देऊन पळवून लावले होते. 

वनाधिकारी असलेल्या भारती भुजबळ म्हणाल्या, ‘‘कामानिमित्त जंगलात फिरावे लागते. मात्र, लाठीकाठी, धावणे, तलवारबाजी आदी प्रशिक्षणाचा मोठा फायदा होतो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gorakhnath More teaches self defense lessons to ten thousand young girl