गुजराती डाॅक्टरने घेतला मराठी शाळा टिकाविण्याचा ध्यास!

अमित गवळे
शुक्रवार, 15 जून 2018

पाली : इंग्रजी भाषेला दिवसागणीक वाढत चाललेले महत्व पाहता बहुसंख्य पालक अापल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच दाखल करतात. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत. मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यासच त्याचा सर्वांगीन विकास होऊ शकतो असे विज्ञान सांगते.त्यामुळेच माणगाव येथील डॉ. उमेश दोशी यांनी मराठी माध्यमाच्या शाळा टिकाव्यात व जगाव्यात यासाठी मोहिम हाती घेतली आहे.

पाली : इंग्रजी भाषेला दिवसागणीक वाढत चाललेले महत्व पाहता बहुसंख्य पालक अापल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच दाखल करतात. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत. मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाल्यासच त्याचा सर्वांगीन विकास होऊ शकतो असे विज्ञान सांगते.त्यामुळेच माणगाव येथील डॉ. उमेश दोशी यांनी मराठी माध्यमाच्या शाळा टिकाव्यात व जगाव्यात यासाठी मोहिम हाती घेतली आहे.

डाॅ. दोशी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्याने मुलांमध्ये होणारा सर्वांगीण विकास कशा प्रकारे होते या संदर्भात लोकांना अावाहन व मार्गदर्शन करत आहे. वृत्तपत्रातील लिखाण, इंग्रजी शाळांबाहेर मराठी भाषेचे महत्व सांगणारे फलक (फ्लेक्स) लावणे, यु ट्युब वरील व्हिडीओ व व्याख्याने अशा विविध माध्यमाद्वारे डाॅ. दोशी मराठी माध्यमाच्या शाळा टिकविण्यासाठी प्रबोधन व जनजागृती करत अाहे. तसेच मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रशुद्ध मांडणी करत आहेत. 

मिशन मराठी या व्हाॅट्सअप ग्रुपद्वारे देखिल ते याचा प्रचार प्रसार करीत आहेत. अात्ता पर्यंत अनेक लोकांनी उत्तम अभिप्राय दिला असुन अापल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेतच दाखल करणार असे अाश्वासन देखिल दिले आहे. असे डाॅ. दोशी यांनी सकाळला सांगितले.

उक्तिला कृतीची जोड
डाॅ. दोशी यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व कळाले मग त्यांनी अापल्या इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलगी हेतल हिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून सातवी पासून सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले. एका माध्यामातून दुसर्या माध्यमात एकदम दाखल करतेवेळी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डाॅ. दोशी यांनी हेतलला सेमी इंग्रजी माध्यमात दाखल केले अाहे. तर तिसरीत शिकणारा मुलगा हंस हा बालवाडीपासूनच मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. अशा प्रकारे अापल्या उक्तीला कृतीची जोड देत त्यांनी अापल्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले.

शास्त्रशुद्ध मांडणी
सर्वसाधारण इंग्लिशमध्ये संभाषण करणे व पुस्तकातील इंग्लिशचा अभ्यास करून परिक्षा देणे ह्या दोन वेग-वेगळ्यागोष्टी आहेत.इंग्लिशमध्ये संभाषण करणे हा सरावाचा भाग आहे व इंग्लिश मधील पुस्तकाचा अभ्यास करणे हा बुद्धी चा भाग आहे. हुशारी किंवा बुद्धी माणसाला कशी मिळते ते पाहू. मोबाईल किंवा संगणक खरेदी करतांना त्याची मेमरी किती आहे ते पाहिले जाते. जितकी जास्त मेमरी तितका जास्त डाटा त्या मध्ये राहतो. हाच नियम मानवाला ही लागू आहे. आपली स्मरणशक्ती ही आपल्या न्युरा̆̆न पेशींवर अवलंबून आहे. ज्या माणसाच्या मेंदूमध्ये जितक्या जास्त न्युरा̆̆न पेशी तितकी त्याची जास्त स्मरणशक्ती. आपल्या सगळ्यांची बुद्धिमत्ता हि जन्मतानाच नक्की झालेली असते. कुठलेही औषध करून ती वाढविता येत नाही हेच कटू सत्य आहे. जितक्या जास्त न्युरा̆̆न पेशी तितकी जास्त बौद्धिक क्षमता. म्हणूनच इंग्लिश बोलणे हा सरावाचा भाग आहे व इंग्लिश मधून परिक्षा देणे व अभ्यास करणे हा बुद्धीचा भाग आहे. असे डाॅ. दोशी यांनी सांगितले.

जाणून घ्या तज्ञांचे व मानसशास्त्रज्ञांचे मत
जगातील सर्व शिक्षण तज्ञांमध्ये व मानसशास्त्रामध्ये याचे अजिबात दुमत नाही की शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हावे. (जी महाराष्ट्रासाठी मराठी आहे). मुल जेव्हा ३-४ वर्षाचे होतात तेव्हा ते त्यांच्या जवळील मातृभाषेतील शब्द समुह वापरून प्रश्न विचारायला लागते. मुल जितके जास्त प्रश्न विचारतील तितका जास्त बौद्धिकतेचा विकास होत असतो. याच वयात त्यांची जिज्ञासा व कुतूहल वाढत असते आणि नेमके याच वयात त्याला इंग्लिश माध्यमामध्ये शिकायला पाठविले जाते. सहाजिकच त्याचा इंग्रजी भाषेचा शब्द समुह कमी असल्यामुळे त्याचे शिक्षकांना व पालकांना प्रश्न विचारणे कमी होते.परिणामी त्याच्या बौद्धिकतेला चालना मिळत नाही. पुढील ४-५ वर्षात म्हणजे वयाच्या ८-९ वर्षापर्यंत त्याचा इंग्लिश भाषेचा शब्द समुह हा वाढलेला असतो व ते प्रश्न विचारायच्या स्थितीत येते पण नेमके या वयात त्याची जिज्ञासा व कुतूहल कमी व्हायला लागते आणि त्याची शिक्षकांना व पालकांना प्रश्न विचारण्याची इच्छा कमी होते. या मुळे त्यांचा प्राथमिक म्हणजेच मुळ पाया कमकुवत राहतो.जर पाया मजबूत असेल तरच इमारत चांगली उभी राहील. अशी माहिती डाॅ. दोशी यांनी दिली

 

 

बऱ्याच सुज्ञ पालकांना याची जाणीव आहे की मराठी माध्यमातून शिकणे हेच चांगले आहे. पण लोक काय म्हणतील? या भ्रमात राहून तुम्ही तुमच्या मुलांचे नुकसान करताय. जर तुम्हाला तुमची मातृभाषा चांगली येत असेल तर तुम्ही जगातली कुठलीही भाषा कुठल्याही वयात शिकू शकता. चांगले इंग्लिश येणे ही सध्या काळाची गरज आहे पण शिक्षणाचे माध्यम मात्र मातृभाषेतून असावे. शिवाजी महाराजांनीच सांगितले आहे ज्याची भाषा गुलाम त्यांचे विचार गुलाम. मग तुमच्या मुलांची शाळा बदलताय ना? मी बदलली आहे.
डाॅ. उमेश दोशी, माणगाव

सहावीपर्यंत इंग्रजी माध्यमात शिकत होते. पण सर्वत्र मराठी भाषा बोलली जात असल्याने इंग्रजीतून शिकलेले फारसे समजत नव्हते.शिकतांना खूप दबाव व ताण यायचा. बाबांनी सातवीला सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले. तेव्हा पासून अभ्यासातील ताण व दबाव पुर्णपणे कमी झाला आहे. अापल्या भाषेतून शिकल्यावर खुप मज्जा व अानंद मिळतो अाणि अभ्यास देखिल चांगला होतो. पुन्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाण्याची इच्छा नाही.
- हेतल उमेश दोशी, विद्यार्थीनी, डाॅ. दोशी यांची मुलगी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Gujrati Doctor supporting Marathi Medium schools in Pali