अपंगाचे चालणे झाले सुकर

संजय बेंडे
बुधवार, 13 जून 2018

भोसरी - पायाने अपंग असलेल्या माणसाची हाताने पुढे जाण्याची कसरत भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते अमित दिलीप सावंत यांनी पाहून त्याला बेअरिंगची चाके असलेली गाडी बनवून दिली. मात्र, त्या गाडीची चाके लहान झाल्याने ती वळवता येत नव्हती. पुन्हा सावंत यांनी गाडीला मोठे बेअरिंग असलेली चाके बसवून देत माणुसकीचे दर्शन घडविले.

दिघी रस्त्यावर उन्हात अपंग माणूस हाताच्या साहाय्याने घसरत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. एक रिक्षावाला अपंग माणसाच्या अगदी जवळ येऊन थांबला. हे पाहून सावंत अपंगाला पुढे घेऊन गेले. हाताने पुढे जात सरकताना त्याच्या हाताला व मांडीला पडलेले घट्टे सावंत यांनी पाहिले आणि त्याला बेअरिंगची चाके असलेली गाडी बनवून द्यायचा निश्‍चय केला. सावंत यांनी तशी गाडी बनविली. मात्र, त्या इसमाचा त्यांच्याकडे पत्ता नव्हता. परिसरात विचारपूस केल्यावर तो एक-दोन हप्त्याने भोसरीत येत असल्याची माहिती समजली. एक आठवड्यानंतर ती व्यक्ती भोसरीत आल्याचे कळताच सावंत यांनी त्याला गाडी देऊन चालविण्याचे प्रात्यक्षिकही घेतले. मात्र, बनविलेल्या गाडीची चाके छोटी झाल्याने गाडी वळविण्यास अडचण येत होती. पुन्हा सावंत यांनी या गाडीला मोठी बेअरिंग असलेली चाके बसविली आणि एका आठवड्यानंतर तो भोसरीत आल्यानंतर ती गाडी त्याच्याकडे सुपूर्त केली आणि माणुसकीचे दर्शन घडविले.

माझे वडील कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्य करतात. त्यांच्यापासून गरजूंना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. संबंधित व्यक्तीला नाव सांगता येत नाही व कमी ऐकू येते. त्यांना रस्त्याने जलद पुढे जाण्याच्या उद्देशाने बेअरिंग असलेली गाडी बनवून दिली.
- अमित सावंत, सामाजिक कार्यकर्ते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: handicapped vehicle amit sawant humanity motation

टॅग्स