खडकाळ माळावर ‘हापूस’चा दरवळ  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

कडेगाव - पुनर्वसित गावठाणात मिळालेल्या ओसाड, खडकाळ माळ आणि मुरमाड असल्याच्या तक्रारी धरणग्रस्तांकडून सुरू असतात. मात्र या दोन एकर जमिनीवर मोठ्या कष्टातून आमराई फुलवण्याची किमया मराठवाडी प्रकल्पातील धरणग्रस्त हणमंत रेठरेकर आणि कुटुंबीयांनी करून दाखवली. १९ वर्षांपूर्वी धरणाजवळच्या रेठरेकरवाडीतून वांगरेठरे (ता. कडेगाव) येथे स्थलांतरित झालेले कुटुंब मूळ गावठाणातील घराला कुलूप ठोकून आमराईत राहते. 

रेठरेकरवाडी १९९८ मध्ये कडेगाव तालुक्‍यातील शाळगावजवळ वांगरेठरेत स्थलांतरित झाली. हणमंत रेठरेकर त्यापैकीच एक. त्यांना गावठाणापासून दोन किलोमीटरवर दोन एकर मुरमाड जमीन मिळाली. जुने घर मोडताना वृद्ध वडील म्हमाले,‘‘‘माळावर झुडपाखाली किती दिवस बसायचं पोरा, सावलीसाठी एखादं दुसरं झाडं लाव’. ते कामाला लागले. दोन एकरांत जेसीबीने खड्डे खोदून केशर, रत्ना, तोतापुरी, हापूस, पायरीची रोपे लावली. काही वर्षे टॅंकर पाणी घेतले. 

उन्हाळ्यात प्लािस्टक कॅन छिद्रे पाडून पुरले. हळूहळू आमराई बहरली. २०१२ मध्ये ते निवृत्त झाले. पूर्णवेळ देऊ लागले. आंब्यांची १७५, चिक्कू, लिंबू, साग, सीताफळ, रामफळ, करवंद, नारळ, गुलाब आदी झाडेही लावली. दोन कूपनिलका आहेत. कालव्याचेही  पाणी आले. त्यांच्यासह सौ. कमल, मुलगा मंगेश आणि कन्या जीविता आणि ज्योती यांचे कष्ट फुललेल्या बागेमागे आहेत. सध्या भरघोस उत्पन्न मिळत आहे. कडधान्य, भुईमुगाचे आंतरपीकही ते घेतात. ग्राहक आंबे खरेदीस येतात. प्रत्येकाला आग्रहाने आंबे खायला देतात. ‘अगोदर खाऊन बघा, आवडले तर घ्या,’ असेही सांगतात. २२५ रुपये डझन दराने आंब्याची विक्री केली जाते. ग्राहकांना आमराईत नेऊन पाडाचे हापूस झाडावरून काढून देण्याची पद्धतही अवलंबली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hanmant Rethrekar story