श्रवणयंत्र सेल बँकेमुळे कर्णबधिरांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नाशिक - नाशिकमध्ये स्थापन झालेल्या श्रवणयंत्र सेल बॅंकेचा लौकिक दोन महिन्यांतच सर्वदूर पोचला आहे. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, जळगाव येथून या बॅंकेकडे सेलला मागणी येऊ लागली आहे.  

नाशिक - नाशिकमध्ये स्थापन झालेल्या श्रवणयंत्र सेल बॅंकेचा लौकिक दोन महिन्यांतच सर्वदूर पोचला आहे. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, जळगाव येथून या बॅंकेकडे सेलला मागणी येऊ लागली आहे.  

रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेने सेवाभावी काम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली श्रवणयंत्र सेल बॅंक आज राज्यातील आदर्श बॅंक ठरली आहे. माई लेले कर्णबधिर विद्यालयात दीडशे विद्यार्थ्यांना दरवर्षी श्रवण यंत्रांसाठी २० हजार सेल आवश्‍यक होते. श्रवणयंत्र तर त्यांना कंपनीकडून मिळायचे, मात्र दर आठवड्याला लागणारे प्रत्येकी १८० रुपयांचे सेल कसे पुरवायचे? ही  मोठी समस्या होती. ही समस्या अर्चना कोठावदे या पाहत होत्या. कोणी यावर मार्ग काढणारा दाता भेटतो का? याचा त्या शोध घेत होत्या. सुदैवाने त्यांना रचना विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संस्थेची साथ मिळाली. कौस्तुभ मेहता, साहेबराव हेम्बाडे, राहुल भावे, सीमा भदाणे, तुषार जिंतुरकर, पूर्वेश बागूल यांनी सव्वा दोन लाख रुपये जमवून बॅंकेला दिले. त्यातून दोन हजार सेल उपलब्ध झाले. ‘संस्थेने हे १८० रुपयांचे सेल १०५ रुपयांत कर्णबधिरांना देण्यास सुरवात केली आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सेल उपलब्ध झाल्याने कर्णबधिरांना दिलासा मिळाला आहे.

सवलतीत सेल मिळू लागल्याने गरीब पालकांची मोठी सोय झाली आहे. विद्यार्थ्यांना श्रवण यंत्राचा पुरेपूर वापर करणे शक्‍य झाले आहे.
- अर्चना कोठावदे, समन्वयक श्रवणयंत्र बॅंक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hearing aid cell