‘निर्भीड’चा गरीब महिलेला आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

म्हसवड - निर्भीड फाउंडेशनतर्फे पिलीव येथील वास्तव्यास असलेल्या दीपाली प्रवीण भंडारी या गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला शिलाई मशिन देऊन आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

म्हसवड - निर्भीड फाउंडेशनतर्फे पिलीव येथील वास्तव्यास असलेल्या दीपाली प्रवीण भंडारी या गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला शिलाई मशिन देऊन आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे आपण रोजच्या खर्चातून जर काही खर्च बाजूला काढून तो जमा करून आपण एखाद्याचे आयुष्य उभे करू शकतो. चहा पिणे, कोल्ड्रिंक्‍स, हॉटेलमधील जेवण अशा बऱ्याच बाबींवर होणारा अतिरिक्त खर्च वाचवून ते पैसे एकत्र करून महिन्याचे ३०० रुपये प्रत्येकी जमा करून या योजनेत सहभागी होता येत असल्याची माहिती डॉ. चेतन गलंडे यांनी दिली. नुकतीच दीपाली भंडारी यांना शिलाई मशिन देण्यात आली. या कुटुंबाला स्वतःचे ना घर आहे, ना गुंठाभर जागा. घरही कुडाचे असून ते सुद्धा गायरान भागात आहे. या कुटुंबातील दोन वर्षांचा मुलगा थालेसेमिया या आजाराने ग्रस्त असून प्रत्येक महिन्याला त्याला रक्त भरण्यासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च करावा लागतो. 

‘निर्भीड’ने या कुटुंबाला अर्थार्जनाचा एक मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या पद्धतीने ही योजना दर महिन्याला राबवण्याचा निर्धार असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन डॉ. गलंडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help to poor women

टॅग्स