सूतगिरणी झोपडपट्टीवासींना मायेची ऊब

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

हिंगणा - वानाडोंगरी नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या सूतगिरणीसमोरील झोपडपट्टीवासींना गुरुवारी (ता.१४)‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘एक पहल’ संस्थेच्या मदतीने ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. थंडीच्या दिवसात लेकरांच्या सुरक्षेसाठी ब्लॅंकेट मिळाल्याने झोपडपट्टीवासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

हिंगणा - वानाडोंगरी नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या सूतगिरणीसमोरील झोपडपट्टीवासींना गुरुवारी (ता.१४)‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘एक पहल’ संस्थेच्या मदतीने ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. थंडीच्या दिवसात लेकरांच्या सुरक्षेसाठी ब्लॅंकेट मिळाल्याने झोपडपट्टीवासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

कार्यक्रमाला सकाळ विदर्भ आवृत्तीचे युनिट हेड संजीव शर्मा, सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, ‘एक पहल’ संस्थेचे अध्यक्ष विजय यादव, पंकज सहारे, पुनित करमिलकर, नीरज सहारे, भूपेंद्र शरणागत, स्वप्नील बंड, तनिष्काच्या अर्पिता आखरे, आशा बुरनुरे होते. प्रास्ताविकात युनिट हेड संजीव शर्मा म्हणाले, सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘सकाळ’ समूहाचा प्रारंभ १९३२ मध्ये झाला. विदर्भात मागील १५ वर्षांपासून कार्यरत आहे. सामाजिक वारसा जोपासण्याचे काम सकाळ समूह करीत आहे. यानंतरही विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. झोपडपट्टीवासींनी शिक्षणाची कास धरावी, असे आवाहन केले. 

‘एक पहल’ संस्थेचे अध्यक्ष विजय यादव यांनी ‘सकाळ’ समूहाचे आभार मानले. या वस्तीत हा पहिला उपक्रम आहे. यानंतर निःशुल्क आरोग्य शिबिर घेण्यात येईल, अशी घोषणा केली.  या वेळी झोपडपट्टीतील सर्व कुटुंबांना ब्लॅंकेटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक रूपेश मेश्राम यांनी केले. आभार तालुका बातमीदार  अजय धर्मपुरीवार यांनी मानले. आयोजनासाठी बातमीदार विनायक इंगळे, सोपान बेताल, शुभम काथवटे, नीलेश्‍वर पटले, विनोद कृपान, सुरेश बुडेकर, प्रज्वल हरणे यांच्यासह इतरांनी सहकार्य केले. या वेळी झोपडपट्टीवासी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hingana news blanket donate by sakal social foundation & Ek pahal Organisation