ओघवत्या शैलीत उलगडला कलेचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

मी मूळ खिरोदा (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. वडील डॉक्‍टर असल्याने मी देखील डॉक्‍टरच व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. प्राथमिक शिक्षण पहूरमध्ये झाले. वडिलांची कायम बदली होत असल्याने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण फत्तेपूर (ता. जामनेर) येथे झाले. पुढे अकरावीसाठी औरंगाबाद महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यातच करिअर करायचे, असे ठरविले होते. मनाविरुद्ध शिक्षण रुचत नसल्याने कसेतरी अकरावी पूर्ण केले. नंतर वडिलांकडे चित्रकलेला प्रवेश घेण्याबाबत हट्ट धरला. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे मी घरी न सांगता दोन वर्षे मित्राकडे यवतमाळला राहायला गेलो.

मी मूळ खिरोदा (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. वडील डॉक्‍टर असल्याने मी देखील डॉक्‍टरच व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. प्राथमिक शिक्षण पहूरमध्ये झाले. वडिलांची कायम बदली होत असल्याने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण फत्तेपूर (ता. जामनेर) येथे झाले. पुढे अकरावीसाठी औरंगाबाद महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. शालेय जीवनापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यातच करिअर करायचे, असे ठरविले होते. मनाविरुद्ध शिक्षण रुचत नसल्याने कसेतरी अकरावी पूर्ण केले. नंतर वडिलांकडे चित्रकलेला प्रवेश घेण्याबाबत हट्ट धरला. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे मी घरी न सांगता दोन वर्षे मित्राकडे यवतमाळला राहायला गेलो. याठिकाणी मी व माझा मित्र आम्ही दोघांनी मिळून चित्र काढली.

दरम्यान, वडिलांनी ती चित्र पाहिल्यानंतर त्यांनी मला घरी परत बोलविले व १९८४ मध्ये खिरोदा (ता. यावल) येथे चित्रकलेच्या शिक्षणासाठी प्रवेश घेऊन दिला. येथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर पुढील ‘बीएफए’च्या शिक्षणासाठी १९८५ मध्ये नागपूर महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच ठिकाणी चित्रकलेचे सर्व प्रशिक्षण व पदवी घेतली. पुढे ‘एमएफए’ला प्रवेश घेतला व १९९० मध्ये उच्चशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर ज्या महाविद्यालयात पहिले चित्रकलेचे शिक्षण घेतले, त्याच महाविद्यालयात मला नोकरी करण्याची संधी मिळाली. आयुष्यातील पहिले ‘लेक्‍चर’ १९९२ मध्ये  घेतले. मुळातच कला अंगात असल्याने आत्मविश्‍वास होताच. ‘बीएफए’च्या वर्गावर मी पहिले लेक्‍चर घ्यायला गेलो. त्यावेळी विद्यार्थ्यांना चित्रकलेतील रंगसंगती, मूलतत्त्वे, संकल्पना मी ओघवत्या भाषेत सांगितल्या. काहीतरी नवीन शिकायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news art rajendra mahajan