ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला बंधारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

गोंदी - घुंगर्डे हादगांव येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने दोनशे फूट लांबीचा बंधारा उभारला आहे. हा बंधारा गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर असल्याने या भागातील पाणीपातळी वाढून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघणार आहे.

घुंगर्डे हादगाव येथील गल्हाटी नदी गावाजवळूनच वाहते. ग्रामस्थांनी एकत्र येत या नदीवर गॅबियन पद्धतीचा बंधारा उभारला आहे. दोनशे फूट लांबीच्या या बंधाऱ्याला सुमारे दहा लाखांपर्यंत खर्च आला असून, तो संपूर्ण खर्च आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने केला आहे, तर संपूर्ण ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान करून बंधारा उभारणीच्या कामात आपले योगदान दिले आहे. या बंधाऱ्यांमुळे गल्हाटी नदीचे पाच किलोमीटर लांबीचे पात्र कायम पाण्याने भरलेले राहणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बंधाऱ्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalna news Villager badhara