'जनकल्याण'ने जपली सामाजिक बांधिलकी; 'पंतप्रधान-मुख्यमंत्री साहाय्यता'ला दिला भरघोस निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janakalyan Corporation

'जनकल्याण'ने जपली सामाजिक बांधिलकी; 'पंतप्रधान-मुख्यमंत्री साहाय्यता'ला दिला भरघोस निधी

कऱ्हाड (सातारा) : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने (Janakalyan Corporation) पंतप्रधान साहाय्यता निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीस प्रत्येकी पाच लाख असा दहा लाखांचे आर्थिक साहाय्य केले. उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे तो धनादेश हस्तांतरित करण्यात आला. (Janakalyan Corporation Donated 10 Lakh To The Prime Minister And Chief Minister Assistance Fund)

संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, संचालक शिरीष गोडबोले, डॉ. प्रकाश सप्रे, जितेंद्र शहा यांच्या उपस्थितीत हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. जनकल्याणने मागील वर्षी पंतप्रधान साहाय्यता निधी, मुख्यमंत्री साहाय्यता निधी व जनकल्याण समिती यांना दहा लाखांचे आर्थिक साहाय्य केले. त्याचबरोबर कोरोना योद्धांना अल्पोपहार, भोजन, मास्क, हॅंडग्लोज, सॅनिटायजर यांचेही वाटप केले आहे.

#National Technology Day 2021 तंत्र आणि सुटकेचा मंत्र

सध्या कोरोनाचा फैलाव होत आहे. त्याचा विचार करून संस्थेच्या संचालक मंडळाने पंतप्रधान साहाय्यता निधी व मुख्यमंत्री साहाय्यता निधीस प्रत्येकी पाच लाख रुपये असा दहा लाखांचा आर्थिक निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहकारी संस्थांचे उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे दहा लाखांचा धनादेश सुपूर्द केला. उपनिबंधक माळी यांनी संस्थेने 502 कोटींच्या ठेवी व 308 कोटींच्या कर्जासह 810 कोटींचा एकत्रित व्यवसाय पूर्ण केल्याबद्दल पदाधिकारी व संचालकांचे कौतुक केले.

Janakalyan Corporation Donated 10 Lakh To The Prime Minister And Chief Minister Assistance Fund