मुलीच्या इच्छेसाठी आई पुन्हा शाळेत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

नागपूर - बारावीच्या परीक्षेत एका विषयात अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण सुटले. त्यानंतर १९ व्या वर्षी लग्न झाल्याने सासरी गेल्यावर शिक्षणाशी संबंधच तुटला. मात्र, मुलगी बारावीत असताना, तिच्या इच्छेपोटी २३ वर्षांनंतर बारावीची पुन्हा परीक्षा देत, शिक्षणाशी पुन्हा नाळ जुळली. ही कहाणी आहे, गडचिरोलीतील दुर्गम भागात राहणाऱ्या जयश्री मडावीची. मनात शिक्षण घेण्याच्या तीव्र इच्छेपोटी शिक्षणाची उच्च शिक्षणाची पायरी चढत बीए द्वितीय वर्षापर्यंत मजल मारली आहे. 

मूळच्या धानोरा तालुक्‍यातील असलेल्या जयश्री मडावी या १९९४ ला बारावीत असताना, परीक्षेत इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण झाल्यात. अनुत्तीर्ण झाल्याने आईने पुन्हा परीक्षेत बसण्यास मनाई केली. तसेच शिक्षण बंद केले. मात्र, मनात शिक्षण घेण्याची आस कायम होती. लग्न झाल्यावर पतीजवळही त्यांनी शिक्षण घेण्याचा हट्ट केला. मात्र, घरची परिस्थिती आणि पतीची नोकरी लक्षात घेता, सारेकाही मनात राहून गेले. मात्र, मुलगी अश्‍विनी शाळेत जाऊ लागताच,  तिचा पूर्ण अभ्यास घेणे, तिला अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी समजावून सांगणे हे काम त्या नेटाने करीत.

अशा प्रकारे दहावी, अकरावीचे शिक्षण पूर्ण करीत, अश्‍विनीने बारावीत प्रवेश घेतला. बारावीत प्रवेश घेतल्यावर परीक्षेचा अर्ज करताना, अश्‍विनीने आईला सोबत बारावीची परीक्षा देण्याचा आग्रह केला. पतीची परवानगी मिळवून जयश्री मडावी यांनी बारावीचा अर्ज भरला. अभ्यास करून दोघीही चांगल्या गुणासह उत्तीर्ण झाल्यात. परंतु, उच्च शिक्षण घेण्याच्या इच्छेने दोघींनीही इग्नुच्या कुरखेडा केंद्रात बीएला प्रवेश घेतला. आज आई जयश्री आणि मुलगी अश्‍विनी दोघीही द्वितीय वर्षाला शिकत आहेत.

शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. इग्नुमुळे उच्च शिक्षणाची संधी दुर्गम भागात मिळाल्याचा आनंद जयश्री मडावी यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसून येतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayashri Madavi School Success Motivation