पोलिस कर्मचाऱ्याने वाढवली वर्दीची शान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुरगूड - कागल तालुक्‍यातील सोनगे येथील नागपंचमीच्या यात्रेत एका महिलेचे सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने व एका युवकाचा मोबाईल हरवला होता. यावेळी याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने हे सर्व दागिने व मोबाईल प्रामाणिकपणे परत करत वर्दीची शान राखली. नागपंचमी दिवशी सोनगे येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात व भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक दाखल झाले होते. या गर्दीत लक्ष्मीबाई कारंजे या महिलेचा सुमारे सव्वादोन लाखांचा पाच तोळे सोन्याचा हार हरविला.

मुरगूड - कागल तालुक्‍यातील सोनगे येथील नागपंचमीच्या यात्रेत एका महिलेचे सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने व एका युवकाचा मोबाईल हरवला होता. यावेळी याठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने हे सर्व दागिने व मोबाईल प्रामाणिकपणे परत करत वर्दीची शान राखली. नागपंचमी दिवशी सोनगे येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात व भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक दाखल झाले होते. या गर्दीत लक्ष्मीबाई कारंजे या महिलेचा सुमारे सव्वादोन लाखांचा पाच तोळे सोन्याचा हार हरविला. याच दरम्यान, लखन जगताप यांचा मोबाईल हॅंडसेटही यात्रेत हरवला. यात्रावेळी मुरगूड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्तासाठी करवीर स्ट्रायकिंग फोर्सचे पोलिस कर्मचारी नंदकुमार आनंदराव सिद्ध हे कर्तव्य पार पडत होते. सुदैवाने हा मोबाईल व पाच तोळ्याचा सोन्याचा हार सिद्ध यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती ताब्यात घेऊन यात्रा कमिटीतील संयोजकांना दिली. संयोजकांनी मोबाईल आणि सोन्याचा दागिना सापडला आहे. संबंधितांनी ओळख पटवून हे साहित्य घेऊन जावे, असे आवाहन केले. लक्ष्मीबाई कारंजे यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्याची भेट घेऊन सोन्याच्या हाराची ओळख पटवून दिली. सिद्ध यांनी लक्ष्मीबाईंच्या हाती हार सुपूर्द केला. 

मोबाईलही दिला परत
लखन जगताप यांच्या मोबाईलचीही ओळख पटल्यानंतर तो मोबाईल जगताप यांच्या ताब्यात दिला. नंदकुमार सिद्ध या पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सोनगे येथील राणाप्रताप तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करत वर्दीला सलाम केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jewellery return by police motivation