कांचनगंगा शिखराला मराठवाड्याची गवसणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - भारतातील सर्वोच्च कांचनगंगा शिखर मराठवाड्यातील 40 ट्रेकर्सनी सर केले. "के-3' नावानेही ओळखले जाणारे हे शिखर चढायला अतिशय कठीण मानले जाते. चाळीस जणांमध्ये औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि मुंबईमधील व्यापारी, डॉक्‍टर आणि शिक्षकांचा समावेश होता.

सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपतर्फे डॉ. राजू सुरवसे, डॉ. चंद्रशेखर भालेराव आणि केदार खटिंग यांनी ही मोहीम आयोजित केली होती. बहुतांश जणांना अनुभव नसताना इच्छाशक्तीच्या बळावर 17 हजार 800 फूट उंचीचे शिखर सर केले, अशी माहिती ट्रेकचे मार्गदर्शक गजानन सराफ यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanchanganga peak Marathwada Trackers