esakal | वारांगणांना 'हक्काची ओळख'; कऱ्हाडच्या तहसीलदारांनी जपली 'बांधिलकी'
sakal

बोलून बातमी शोधा

Tehsildar Amardeep Wakde

कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनापुढे लॉकडाउनशिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे.

वारांगणांना 'हक्काची ओळख'; कऱ्हाडच्या तहसीलदारांनी जपली 'बांधिलकी'

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : लॉकडाउनमुळे (Coronavirus Lockdown) ज्यांचे जीन महाग झाले आहे, अशा येथील वारांगणा वस्तीतील अनेक वारांगणांचे रेशनिंगच्या धान्यावरच गुजराण सुरू आहे. मात्र, त्यातील अनेकांना रेशनिंग कार्डच (Rationing Card) नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले. त्याची माहिती घेऊन तहसीलदार अमरदीप वाकडे (Tehsildar Amardeep Wakde), पुरवठा निरीक्षक गोपाल वसू यांनी तातडीने त्यांची कागदपत्रे मागवून घेऊन आज २३ वारांगणांना रेशनिंगकार्ड प्रदान केले. त्यामुळे त्यांना आता हक्काची ओळख मिळाली असून, महिन्याला दहा किलो धान्य मिळणार आहे. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघाला आहे. (Karad Tehsildar Amardeep Wakde Gave Ration Cards To 23 Women Satara Marathi News)

कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे प्रशासनापुढे लॉकडाउनशिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे, तर व्यवसायांवरही मर्यादा आल्या आहेत. सध्या वारांगणा वस्तीतील अनेक वारांगणांचा रेशनिंगच्या धान्यावरच उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र, त्यांना इतर खर्चासाठी पैसेच नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे. संबंधित वारांगणा वस्तीतील अनेक वारांगणाकडे रेशनिंग कार्डच नसल्याने त्यांना धान्यही मिळत नसून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: अंधत्वाचं दुःख बाजूला सारून दिव्यांगांनी बनविले 25 हजार 'सीडबॉल'

त्याची तत्काळ माहिती घेऊन तहसीलदार वाकडे यांनी पुरवठा अधिकारी वसू यांना संबंधितांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने संबंधितांना रेशनिंग कार्ड देण्याची निर्णय घेतला. त्यानुसार आज वारांगणा वस्तीतील २३ वारांगणांना आज त्यांच्या तेथे जाऊन रेशनिंग कार्डांचे वितरण केले. त्यामुळे त्यांना आता प्रधानमंत्री गरीब कल्याण कार्यक्रमांतर्गत आता नोव्हेंबरपर्यंत प्रति माणसी दहा किलो धान्य मिळणार आहे. त्यातून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी वारांगणा संघटनांचे प्रतिनिधी, धान्य दुकानदार उपस्थित होते.

हेही वाचा: ज्या हातांना पकडलं, त्याच हातांनी पोलिसांना बंडातात्यांनी जेवू घातलं!

दहा किलो धान्य वाटप केले

रेशनिंग कार्ड मिळालेल्या २३ वारांगणांना रेशनिंगचे धान्य मिळाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेशनिंगचे धान्य मिळेपर्यंत संबंधित वारागणांची गैरसोय होऊ नये, यासाठी तहसीलदार वाकडे, पुरवठा निरीक्षक वसू व रेशनिंग दुकानदारांमार्फत संबंधितांना प्रत्येकी १० किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

Karad Tehsildar Amardeep Wakde Gave Ration Cards To 23 Women Satara Marathi News

loading image