ज्या हातांना पकडलं, त्याच हातांनी पोलिसांना बंडातात्यांनी जेवू घातलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bandatatya Karadkar

आषाढी पायी वारीसाठी राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी दिली आहे.

ज्या हातांना पकडलं, त्याच हातांनी पोलिसांना बंडातात्यांनी जेवू घातलं!

कऱ्हाड (सातारा) : आळंदीवरुन पंढरपूरला पायी वारीने (Alandi-Pandharpur Wari) जाण्यासाठी निघालेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, किर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर (Bandatatya Karadkar) व सहकाऱ्यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेवून करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात (Shrikrishna Gopalan Center) आणून स्थानबध्द केले. तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. दरम्यान, बंडातात्यांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करुन तेथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना व सहकाऱ्यांना जेवण घातले. त्यांच्या या शिष्टाईने पोलिसही भारावून गेले. (Ashadhi Ekadashi Wari 2021 Bandatatya Karadkar Made His Own Meal And Fed The Karad Police)

आषाढी पायी वारीसाठी (ashadhi ekadashi wari) राज्य सरकारने (maharashtra government) परवानगी नाकारली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारचा निर्णय नाकारुन बंडातात्या पायी वारीसाठी निघाले होते. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे बंडातात्यांनी आळंदी येथे जाहीर केले होते. त्यानुसार, शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना सोडवण्यासाठी बंडातात्या तिथे पोहचल्यावर त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना करवडी येथील त्यांच्या श्रीकृष्ण गोपालन केंद्रात आणून सोडले.

हेही वाचा: 'ज्ञानेश्वर, तुकारामांच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महागात पडेल'

Bandatatya Karadkar

Bandatatya Karadkar

तेथे बंडातात्या यांनी शांत, संयमी आणि सांप्रदायाच्या चाकोरीतून चाललेले आंदोलन पोलिसांनी आपल्या खाक्याप्रमाणे मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मला आणि पांडुरंग घुले महाराज यांना ताब्यात घेवून स्थानबद्द केले आहे. वारीपेक्षा ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची पायी पालखी वारी झाली पाहिजे हा आमचा अट्टाहास होता. वारकरी सांप्रदायाचा पाईक म्हणून महान संताच्या पालख्यांना केलेला विरोध शासनाला महाग पडेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी गोपालन केंद्र पसिसरात बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, बंडातात्यांनी पहाटेचे श्रमदान, आंघोळ, पूजा व धार्मिक विढी आटोपला. त्यानंतर त्यांनी स्वतः भाकरी, आमटी, भाजी करुन तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना व सहकाऱ्यांना जेवण घातले. त्यांच्या या बांधिलकीमुळे पोलिसही भारावून गेले.

हेही वाचा: चक्क प्राचार्यानं शेतीसाठी सोडलं पद अन् पत्नीसोबत फुलवला भाजीचा मळा!

पोलिस अधिकाऱ्यांनीही घेतला आस्वाद

बंडातात्या कऱ्हाडकर यांना शनिवारी पुणे पोलिसांनी आणून येथली करवडी येथील गोपालन केंद्रात आणून सोडले आहे. तेथे पहिल्या दिवशी शनिवारी पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी बंडातात्यांबरोबर जेवण केले. तर बंडातात्यांनी स्वतः केलेल्या जेवणाचा कऱ्हाड तालुका पोलिस (Karad Taluka Police Station) निरीक्षक बाळासाहेब भरणे (Police Inspector Balasaheb Bharane) यांनी आस्वाद घेतला.

Ashadhi Ekadashi Wari 2021 Bandatatya Karadkar Made His Own Meal And Fed The Karad Police

Web Title: Ashadhi Ekadashi Wari 2021 Bandatatya Karadkar Made His Own Meal And Fed The Karad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bandatatya Karadkar
go to top