Hindu-Muslim Unity
Hindu-Muslim Unityesakal

माणुसकीचं दर्शन! 800 वर्ष जुन्या मंदिरासाठी हिंदू-मुस्लिमांची एकजूट

Summary

धार्मिकतेची साखळी तोडून मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत माणुसकीचं दर्शन घडवलंय.

मंगळुरु : कर्नाटकातील (Karnataka) एक मंदिर सध्या चर्चेचा विषय बनलंय. धार्मिकतेची साखळी तोडून मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत माणुसकीचं दर्शन घडवलंय. हिंदू आणि मुस्लिम (Hindu-Muslim) समाजाच्या लोकांनी मिळून 800 वर्षे जुन्या मंदिराला नवं रूप देण्याचा निर्णय घेतलाय. आता आपण मंगळुरूपासून 65 किमी अंतरावर असलेल्या या गावाची कथा सविस्तरपणे समजून घेऊ..

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पुत्तूरजवळील (Puttur Mangaluru) या गावात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, यात फारसं यश आलं नाही. यावेळी माध्यमांशी बोलताना समितीचे खजिनदार प्रसन्न राय म्हणाले, अनेक वेळा मुस्लिम बांधवांनी आम्हाला जीर्णोद्धाराच्या कामासाठी विनंती केली. गावात जवळ-जवळ 30 टक्के मुस्लिम आणि 50 टक्के हिंदू आहेत. सन 2019 मध्ये मंदिर जीर्णोद्धार समिती स्थापन करण्यात आली, तेव्हापासून जीर्णोद्धाराचं काम सुरूय.

Hindu-Muslim Unity
Hindu-Muslim Unity
Hindu-Muslim Unity
प्रशांत किशोर-ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध बिघडले?

या मंदिराच्या कामासाठी अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले. यासोबतच देणगीदारांवर कोणताही आर्थिक बोजा पडू नये, यासाठी खर्चाची स्वतंत्र विभागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसन्न पुढे सांगतात, मंदिराच्या कामाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत आम्ही व्हॉट्सअॅप ग्रुप्सच्या मदतीनं सर्वाधिक पैसा उभारलाय. या माध्यमातून सुमारे 2 कोटी रुपयांचं काम होऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, मंदिराच्या या कामात शेकडो लोकांनीही मदत केलीय. अहवालानुसार, रहिवासी अब्बास मजलुगडे, अबुबकर कुदुरस्ते, पुट्टू बैरी यांनी गेल्या वर्षी मंदिरासाठी तीन एकर जमीन दान केलीय.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com