प्रशांत किशोर-ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध बिघडले? निवडणुकीच्या यादीवरून 'टीएमसी'त गदारोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee vs Prashant Kishor

'पक्षाशी संबंधित नसलेल्या कोणत्याही गोष्टीवर मी भाष्य करणार नाही. कृपया 'असे' प्रश्न मला विचारू नका.'

प्रशांत किशोर-ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध बिघडले?

बंगालमध्ये होणार्‍या 108 नगरपालिका निवडणुकीसाठी (Bengal Municipal Election) उमेदवारांच्या यादीवरून सोमवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील (Trinamool Congress) कलह वाढल्याचं पहायला मिळालं. यानिमित्तानं राज्यभर आंदोलनं झाली. या प्रकरणामुळं टीएमसी आणि प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील राजकीय सल्लागार I-PAC यांच्यातील संबंधांमध्ये तणावाच्या अफवा देखील समोर आल्या आहेत.

हेही वाचा: 'जातीयवादी पक्षांकडून देशात दुफळी माजविण्याचा प्रयत्न'

शुक्रवारी सायंकाळी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) आणि पक्षाचे अध्यक्ष सुब्रत बक्षी (Subrata Bakshi) यांनी त्यांची स्वाक्षरी असलेली पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केल्यावर हा वाद सुरू झाला. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर उमेदवारांची स्वतंत्र यादी देखील दिसून आली. मात्र, त्यावर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. दोन्ही याद्या वेगवेगळ्या असल्याने राज्याच्या विविध भागांत आंदोलनं झाली. अनेक असंतुष्ट टीएमसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून टायर जाळताना आणि घोषणाबाजी करताना दिसले. पार्थ चॅटर्जी आणि सुब्रता बक्षी यांनी जाहीर केलेली उमेदवारांची यादी अंतिम आहे, असं ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काँग्रेसबद्दलचं विधान अत्यंत चुकीचं : राऊत

पीकेबद्दल काय म्हणाल्या ममता?

टीएमसी आणि आय-पीएसी संबंध बिघडण्याच्या मार्गावर असल्याच्या वृत्तावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, पक्षाशी संबंधित नसलेल्या कोणत्याही गोष्टीवर मी भाष्य करणार नाही. कृपया असे प्रश्न मला विचारू नका, जे पक्षाच्या अंतर्गत घडामोडीशी संबंधित नाहीत. पक्षाच्या अंतर्गत घडामोडीशी संबंधित काही असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही जे प्रश्न विचारत आहात, त्याचा पक्षाच्या कारभाराशी कोणताही संबंध नाही, असं त्यांनी मीडियाला उत्तर दिलं आणि पीकेंबद्दल (Prashant Kishor) ममतांनी बोलणं टाळलं. एका वृत्तानुसार, I-PAC अधिकार्‍यांनी सांगितलं की, I-PAC आणि TMC यांच्यातील संबंध बिघडण्याचं वृत्त निराधार आहे, त्यात काहीच तथ्य नाही, असं स्पष्ट केलं.

Web Title: Bengal Election Prashant Kishor Relation With Mamata Banerjee Also Deteriorated Uproar In Tmc After Municipal Election List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top