esakal | कॅन्सरला हरवून तेजस नव्या 'लढाई'वर
sakal

बोलून बातमी शोधा

कॅन्सरला हरवून तेजस नव्या 'लढाई'वर

कॅन्सरला हरवून तेजस नव्या 'लढाई'वर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कासारे (जि. जळगाव) - येथील खानदेश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाचा दहावीतील विद्यार्थी तेजस पोतदार "वर्ल्ड चिल्ड्रन्स विनर्स गेम इन मॉस्को' या स्पर्धेत रशियात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाला. ही जागतिकस्तरावरील स्पर्धा बुधवारपासून (ता. 31) सुरू होत आहे.

खानदेश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी तथा कलाशिक्षक भालचंद्र पोतदार यांचा मुलगा तेजस पोतदार कॅन्सरसारख्या आजाराने लहानपणापासून ग्रासला. शिक्षक भालचंद्र पोतदार यांनी हार न मानता मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये हेलपाटे घालून मुलाला आजारातून बरे केले.

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून वाचलेल्या 20 मुलांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी त्यांना क्रीडा स्पर्धेत उतरवणे अधिक लाभदायक राहील, यादृष्टीने मुंबईत स्पर्धा घेतल्या गेल्या. सात ते 15 वर्षे वयाच्या 20 मुलांपैकी 15 मुलांची निवड झाली व त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. तेच भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यात तेजस पोतदारही सहभागी आहे.
ही स्पर्धा "गिफ्ट ऑफ लाइफ फाउंडेशन'तर्फे घेतली जाते.

loading image