खांडसईची यशोगाथा; लोकसहभागातून बंधारे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सुधागड तालुक्‍यातील खांडसई गावाला मार्चअखेरीसच तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागते; मात्र या वर्षी खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश यादव व उपसरपंच नथुराम चोरघे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहभागातून नुकतेच बंधारे बांधण्यात आले. यामुळे येथील पाणी प्रश्न मार्गी लागून भूजलपातळीत वाढ झाली आहे. 

खांडसई व कासारवाडी गावात वर्षानुवर्षे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर होतो. त्यामुळे येथील जलस्रोत टिकवून भूजलभरणा वाढवावा, ही कल्पना सरपंच यादव यांना सुचली. त्यानुसार ग्रामस्थांनी खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर बंधारा बांधला. या कामासाठी स्थानिक आदिवासींनी मौलिक सहकार्य केले. पाणी अडविल्याने पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. भूजलभरणा वाढला आहे.  

खांडसई व कासारवाडी येथील ओढ्यावर वेळेत बंधारा बांधला व दुरुस्ती केली. त्यामुळे ओढ्याशेजारील विहिरीला अंतर्गत पाणीपुरवठा होऊन पुनर्भरणा झाला. आता या विहिरीतील मुबलक पाणी पंपाद्वारे खांडसई गावातील विहिरीत सोडले जात आहे. त्यामुळे खांडसई गावाचा पाणीप्रश्न सुटला आहे.
- नथुराम चोरघे, उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत सिद्धेश्वर (खांडसई)

ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांवरील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी नुकतेच एका जलतज्ज्ञांना बोलावले होते. त्यांनी परिसराचे सर्वेक्षण केले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करू. ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनाने हा प्रश्न नक्कीच मार्गी लागू शकतो. ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.
- उमेश गोविंद यादव, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत; सिद्धेश्वर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandasai Success Story