परिश्रमातून श्रीपादने मिळवले लखलखीत यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

दोडामार्ग - वडील फोटोग्राफर आणि आई गृहिणी, पण शिकण्याची प्रखर जिद्द. त्याला परिश्रमाची जोड असेल, तर यश आणि मार्ग आपोआप मिळत जातात. साटेली भेडशी येथील फोटोग्राफर पवन गोवेकर यांचा मुलगा श्रीपाद याने मिळवलेले उत्तुंग यश पाहता ते नक्की पटतं!

दोडामार्ग - वडील फोटोग्राफर आणि आई गृहिणी, पण शिकण्याची प्रखर जिद्द. त्याला परिश्रमाची जोड असेल, तर यश आणि मार्ग आपोआप मिळत जातात. साटेली भेडशी येथील फोटोग्राफर पवन गोवेकर यांचा मुलगा श्रीपाद याने मिळवलेले उत्तुंग यश पाहता ते नक्की पटतं!

दहावीच्या परीक्षेत मिळालेले ९९ टक्के गुण हे श्रीपादच्या अथक परिश्रमाचे, आई, वडील. काका, काकी, आजी, आजोबा आणि गुरुजनांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित म्हणावे लागेल. कोनाळकट्टा येथील एम. आर. नाईक विद्यालयात श्रीपाद शिकला. वडील व्यवसायात व्यस्त तर आई घरकामात पण त्यांचा श्रीपादच्या प्रगतीकडे कटाक्षाने लक्ष असे. घरातील अन्य सदस्यही त्याच्या प्रगतीबाबत दक्ष असायचे. त्याच्या शिक्षकांशी चर्चा करायचे. शिक्षकही चांगले मिळाले. त्याला श्रीपादच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड होतीच, त्यामुळे तो ९९ टक्के गुण मिळवून तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळवला. केवळ गुणवत्तेत तो अव्वल आहे, असे नाही तर एक आदर्श विद्यार्थी आहे.

घरी शैक्षणिक वातावरण नाही. त्यातच घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. असे असताना श्रीपादने मिळवलेले यश नक्कीच त्याच्या भावी कार्य कर्तृत्वाला झळाळी देणारे असेच म्हणावे लागेल.

व्हायचंय इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर
इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर व्हायचे आपले स्वप्न आहे. स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी त्याचा पाठलाग करावा लागतो. दिवसरात्र मेहनत करावी लागते. आपण जे स्वप्न पाहिले त्याला आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकी आणि सर्व शिक्षकांचा पाठिंबा मिळाला. माझ्या यशाचे सारे श्रेय मी त्यांना देतो, असे श्रीपादने ‘सकाळ’ला सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: konkan news ssc result shreepad