७५ टक्के अंधत्व; तरी शिष्यवृत्तीत यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

राजापूर - जन्मजात सुमारे पंचाहत्तर टक्के अंध. तरीही उच्च ध्येय गाठण्याची महत्त्वाकांक्षा. अपंगत्वाने खचून न जाता यशाचे शिखर गाठण्याचा नेहमीच तिच्या ध्यास. त्यामुळे आत्मिक बळाला प्रयत्नांची जोड देत तालुक्‍यातील नाणार येथील तनिषा पेडणेकरने यशाला गवसणी घातली. तनिषाने मदतनीसाच्या साह्याने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तीनशेपैकी १४६ गुण मिळवले.

वडिलांचा छोटासा व्यवसाय आणि आई अंगणवाडी सेविका. तनिषा जन्मजात पंचाहत्तर टक्के अंध असल्याने शारीरिकदृष्ट्या अपंग होती;  मात्र बौद्धिकदृष्ट्या कणखर आणि तल्लख असलेल्या तनिषाने अन्य मुलांसोबत श्रीगणेशा नाणार येथील जिल्हा परिषदेच्या  शाळेत गिरवला. शिक्षकांनीही जिद्दीने तिला मार्गदर्शन सुरू केले. उत्तम वक्तृत्व आणि नृत्यात निपुण ही तिची आणखी वैशिष्ट्ये. प्रशालेचे मुख्याध्यापक  हिदायत भाटकर आणि सहकारी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने परीक्षेची जोरदार तयारी केली. दीड ते दोन फुटांपर्यंतच स्पष्ट दिसत असलेल्या तनिषाला फळ्यावरील वाचण्याचा त्रास होतो. त्यामुळे परीक्षेच्या तयारीसाठी वैयक्तिक तोंडी मार्गदर्शनाचे विशेष वर्ग घेण्यात आले. परीक्षेच्या वेळी मदतनीस  असलेल्या विद्यार्थ्याचेही योगदान मोलाचे ठरले. नाणारसारख्या ग्रामीण भागातून तनिषाने मिळविलेले यश साऱ्यांसाठी निश्‍चितच आदर्शवत आहे. याबाबत तिचे विशेष कौतुक केले जात आहे.

Web Title: konkan news tanish pedanekar scholarship