शेतकऱ्याने दिले गरुडाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

कोरेगाव - जखमी अवस्थेत सापडलेल्या एका गरुडाची तीन दिवस सुश्रूषा करून त्याला बाबाचीवाडी, सातारारोड (ता. कोरेगाव) येथील एका शेतकऱ्याने जीवदान दिले. ‘सरपंट ईगल’ नावाचा हा पक्षी असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी संजीवन चव्हाण यांनी दिली.

कोरेगाव - जखमी अवस्थेत सापडलेल्या एका गरुडाची तीन दिवस सुश्रूषा करून त्याला बाबाचीवाडी, सातारारोड (ता. कोरेगाव) येथील एका शेतकऱ्याने जीवदान दिले. ‘सरपंट ईगल’ नावाचा हा पक्षी असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी संजीवन चव्हाण यांनी दिली.

बाबाचीवाडी येथील शेतकरी तानाजी फाळके यांची शेती टेक नावाच्या शिवारात आहे. याठिकाणी ज्वारीची काढणी सुरू असताना त्यांना शेतात एक गरुडाचे पिल्लू आढळून आले. त्याची उडून जाण्याची हालचाल लक्षात घेता काही वेळाने ते निघून जाईल, असे समजून फाळके यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्या दिवशीही ते पिल्लू तेथेच आढळले. त्यामुळे बारकाईने पाहिले असता, पिलाच्या पायाला जखम असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न करून फाळके यांनी सातारारोड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे पिलावर उपचार झाले, त्याच्या पायाला मलमपट्टी केली. आनंदाश्रम मेडिकलच्या मालकांनी मोफत औषधेही दिली. त्यानंतर फाळके यांनी दोन- तीन दिवस पिलाची सुश्रूषा केली. हा पक्षी मांसाहारी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला स्वखर्चाने मांसाहार देण्याचीही व्यवस्था केली. त्यामुळे पूर्वीपेक्षा पिलू टवटवीत दिसू लागले. याबाबत त्यांनी सातारारोड पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस नाईक सनी आवटे यांना माहिती दिली. आवटे यांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनरक्षक राम शेळके सातारारोड येथे आले. त्यांच्या ताब्यात फाळके यांनी गरुडाचे पिलू दिले. या पिलावर आणखी आवश्‍यक उपचार केल्यानंतर त्याला सोडून देणार असल्याचे वनरक्षक शेळके यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: korgaon news farmer life saving to eagle