Video: आयुष्याच्या संघर्षावर सिनेमा तयार होतोय; पण डोक्यावर छप्पर नाही!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

सांगवी/ सोमेश्‍वरनगर - नवऱ्याच्या उपचारासाठी बारामतीच्या ‘शरद मॅरेथॉन’मध्ये पासष्टवर्षीय ज्येष्ठ महिला अनवाणी धावली आणि जिंकलीदेखील. त्यामुळे ती राष्ट्रीय पातळीवर नावाजली गेली. तिने बारामती येथे झालेल्या सलग तीन मॅरेथॉन (ज्येष्ठ नागरिक गट) जिंकल्या आणि नवऱ्याचे उपचारही पूर्ण केले. त्या लता भगवान करे या महिलेच्या जीवनसंघर्षाची कहाणी आता मोठ्या पडद्यावरही आली. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती आहे तशीच असून, त्यांचे कुटुंब भाडेतत्त्वावरील घरात राहात आहेत.  

जळोची (ता. बारामती) येथे बारा- तेरा वर्षांपूर्वी करे कुटुंब मोलमजुरीसाठी आले. ते मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील मांडवा (ता. मेहकर) गावचे. करे यांची ही कहाणी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाली. हैदराबादमधील दैनिकात ही बातमी आली. त्यानंतर ‘परमज्योती क्रिएशन्स’ यांनी त्यांच्यावर डॉक्‍युमेंटरी काढण्याचा निर्णय घेतला. परंतु, दिग्दर्शक नवीनकुमार देशबोईना व निर्माता आराबोथु कृष्णा यांनी त्यांची कहाणी ऐकल्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लता करे यांची भूमिका करण्यासाठी महिला मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनाच मुख्य भूमिकेत ठेवले. त्यांचे पती भगवान, मुलगा सुनील, राधा चव्हाण, प्रशांत महामुनी हेही या चित्रपटात आहेत. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रसिद्ध झाला. ‘चित्रपट चालला तर त्यांना मदत होऊ शकेल,’ असे नवीनकुमार यांनी सांगितले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवऱ्याच्या उपचारासाठी बारामतीच्या शरद मॅरेथॉनमध्ये जिद्दीनं पळाले होते. त्याची समद्यांनी दखल घेतली. अजितदादा, सुप्रियाताई, सुनेत्राताई यांनी गाडी पाठवून उपचारासाठी मोठी मदत केली आणि ते बरे झाले. 
 - लता भगवान करे 

माझ्या मंडळीने जिवाची तमा न बाळगता पळून पाच हजार मिळविले. आदल्या दिवशी तिला थंडीतापही आला. मी, मुलांनी ‘जाऊ नकोस’ अशी गळही घातली. पण, तिने गोळ्या घेतल्या आणि थंडीच्या कडाक्‍यात पळायला गेली. 
 - भगवान करे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lata kare struggles of life