प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबांना महाबळेश्वरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मदत

अभिजीत खूरासणे
Wednesday, 16 September 2020

यापुर्वी देखील समाजकार्यात अग्रेसर असलेल्या रोहित ढेबे व आर.डी ग्रुपच्या वतीने अनेकांना मदत करण्यात आली आहे. 

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरातील काही भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. येथील प्रभाग क्रमांक आठमधील गणेश नगर हौसिंग सोसायटी हा भाग देखील काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाच्यावतीने बंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित ढेबे यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दत्तात्रयभाऊ  वाडकर, आर.डी.ग्रुपचे अध्यक्ष संदीप मोरे, अर्बन बॅंक संचालक बाळासाहेब कोंढाळकर, गजानन फळणे, सागर शिंदे, दिनेश फळणे, राहुल जाधव, संतोष ढेबे, दिनेश आखाडे, अभिजीत वागदरे, स्वप्निल फळणे, प्रमोद पाटणे, नाना जाधव, स्वप्निल साळुंखे, प्रभाकर आरडे, विजय पारठे, सचिन ननावरे, अशोक आरडे, प्रमोद फळणे, संदीप ढेबे, गणेश ढेबे, यश मोरे, मनीष मोहिते, सुनिल चोरगे 
उपस्थित होते.

काँग्रेस आमदारांच्या उत्तराने उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम  

यापुर्वी देखील समाजकार्यात अग्रेसर असलेल्या रोहित ढेबे व आर.डी ग्रुपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किट सोबतच पोलिस बांधव, पत्रकार व पालिका कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर्स आदीं उपलब्ध करून देण्यात आले होते.

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahableshwar Nationalist Youth Congress Helped Covid Affected Area