पोटासाठी कव्वालीचा आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मंचर - येथील बस स्थानकासमोर रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे व कव्वाली गाताना एक कुटुंब दिसते. त्यांच्या गायनाचे सूर कानावर पडल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळींची पावले त्या दिशेने वळतात आणि त्यांच्या गायनाने खूष होऊन त्यांना आर्थिक मदतही करतात.

पोटाची खळगी भरण्यासाठी आयुबभाई मनचला व त्यांचे कुटुंबीय रस्त्यावर बसून पोवाडे, कव्वाली गातात. त्यांचा पिढ्यान्‌पिढ्या गायनाचा व्यवसाय आहे. पोवाडे व कव्वाली गायनाच्या माध्यमातून या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.

‘किती सांगू शिवाजी महाराजांची महती, तळपती तलवार भवानी मातेची, शिवरायांची, भोळ्या शंकरा, चढता सूरज धीरे धीरे, ख्वाजा मेरे ख्वाजा’ अशी गीते ऐकून नागरिक मंत्रमुग्ध होतात. मनचल कुटुंबीयांच्या सुरेल आवाजाने भारावून त्यांचे कौतुक करतात.

याबाबत आयुबभाई मनचला म्हणाले, ‘‘दररोज एक किंवा दोन ठिकाणी कार्यक्रम सादर करतो. पावसामुळे कधी कधी कार्यक्रम सादर करता येत नाही. मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून उदरनिर्वाह करतो.

Web Title: manchar news Qawwali livelihood

टॅग्स